Pune News

Pune News : रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत असताना शिवाजीनगर व डेक्कन पोलिसांकडून दरोडेखोरांना अटक

942 0

पुणे : पुणे शहरातील (Pune News) गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या उद्देशाने विशेष मोहिम राबविण्याबाबत मा. पोलिस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. सह पोलिस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी प्रभावीपणे कारवाई करणेबाबत वारंवार सुचना दिल्या आहेत. मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. प्रविण कुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त परि-०१ श्री. संदिप सिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग श्री. वसंत कुवर यांचे सुचनांप्रमाणे गुन्हेगारीवर आळा बसविणेबाबत युध्द पातळीवर काम चालु असताना दिनांक ०४/०७/२०२३ रोजी मध्यरात्री ११/३० वाजणेचे सुमारास वृध्देश्वर घाट, शिवाजीनगर पुणे येथे नदीपात्रालगत असलेल्या गोठ्याजवळ ०८-०९ मुले ही हातामध्ये धारदार शस्त्रे घेवुन काही योजना आखत असलेबाबत सहा. पोलिस निरिक्षक भोलेनाथ अहिवळे यांना गोपनीय माहिती मिळाली. लागलीच सपोनि अहिवळे यांनी सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना कळविली. याबाबत वरिष्ठांनी सदर ठिकाणी जावून खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशित केले…

सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रवाना होवुन सदर ठिकाणी तात्काळ पोहचुन बातमीचे अनुषंगाने वृध्देश्वर घाट, शिवाजीनगर पुणे येथे नदीपात्रालगत असलेल्या गोठ्याजवळ ०८-०९ मुले ही हातामध्ये धारदार शस्त्रे घेवुन उभे असलेली मिळुन आली. याठिकाणी सदरची मुले ही हत्यारासह उभी असल्याने तसेच ती नदीपात्रातील मोकळे मैदानाचा व अंधाराचा फायदा घेवुन पळुन जावु नये याकरीता सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे यांनी त्याठिकाणी अंधारामध्ये दबा धरून, डेक्कन पोलिस ठाणे कडील राजगस्तीवर असलेल्या महिला पोलिस उप निरिक्षक मिरा कवटीकवार आणि त्यांच्या पोलिस स्टाफची मदत मागितली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन डेक्कन पोलिस ठाणे कडील राजगस्तीवर असलेल्या महिला पोलिस उप निरिक्षक मिरा कवटीकवार आणि त्याचा पोलिस स्टाफ हा तात्काळ त्याठिकाणी हजर झाला. यावेळी सापळा रचुन सदर मुलांना पोलीस आल्याचे समजल्यावर ते पळून जात असताना त्यांचा काही अंतरावर पळत जावुन पाठलाग करुन त्या सर्वांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

Mumbai News : मुंबई हादरली! वरळी सी फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

यावेळी सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे यांनी त्यांची व पोलिस पथकाची त्यांना ओळख करुन देवुन त्यांना त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांची नावे – १) गौतम ऊर्फ लखन अंबादास बनसोडे वय २९ वर्ष राहणार पीएमसी कॉलनी, बिल्डिंग नंबर ३, राजेंद्रनगर पुणे २) राम विलास लोखंडे वय २३ वर्ष, नवी पेठ पुणे ३) सुनिल बाबासाहेब कांबळे, वय २० वर्ष, रा. गल्ली नंबर १०, पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे ४) अश्रु खंडु गवळी, वय १९ वर्ष, रा. दांडेकर पुल, पुणे ५) रोहन किरण गायकवाड वय १९ वर्ष, राहणार गल्ली नंबर ५, पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे ६) रोहित चांदा कांबळे, वय १९ वर्ष, रा. गल्ली नंबर १०, पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे ७) किरण सिताप्पा कांबळे वय १९ वर्ष, रा. गल्ली नंबर ५, पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे ८) ओंकार बाळु ननावरे वय २१ वर्ष, रा. राजेंद्रनगर, नवी पेठ पुणे ९) श्याम विलास लोखंडे, वय २० वर्ष, रा. राजेंद्रनगर, नवी पेठ पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी हत्यारासह साई पेट्रोलपंप, जंगली महाराज रोड येथे जावून लुटमार करणार होतो असे सांगितले.

Buldhana Bus Accident : बुलढाणा दुर्घटनेचा फॉरेन्सिक अहवाल आला समोर; काय म्हंटले अहवालात?

सदर आरोपी (Pune News) यांचेकडून एक लोखंडी कोयता, एक स्टिलचा रॉड, दोन चाकु, ९ मास्क, एक मिरचेची प्लास्टिकची पुड आणि नायलॉनची रस्सी असा मुददेमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे. याबाबत सदर आरोपींवर डेक्कन पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. १०७/२०२३ भादवि कलम ३९९ ४०२ अन्वये गुन्हा नोंद करणेत आलेला आहे. सदरची कामगिरी ही श्री. प्रविण कुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. संदिप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परि-०१, पुणे शहर, श्री. वसंत कुवर, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विपीन हसबनीस, शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री विक्रम गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री शंकर साळुंखे, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, महिला पोलिस उप निरिक्षक मिरा कवटीकवार पोलीस अंमलदार सिध्देश्वर वाघोले, रामकृष्ण काकड, श्रीकृष्ण सांगवे, विकास सराफ आणि डेक्कन पोलिस ठाणेकडील पोलीस अंमलदार अशोक इनामदार, गणेश तरंगे, शेखर कौटकर, निलेश सोनवणे, नागनाथ बागुले, जगदीश तळोले, मिलींद कदम यांनी केलेली आहे. मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार व मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक यांनी वरील कामगीरी करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस आयुक्त कार्यालय येथे बोलावून त्यांचा सन्मान केला आहे.

Share This News

Related Post

काँग्रेसला जशास तसे उत्तर देऊ; जगदीश मुळीक यांचा कॉंग्रेसला इशारा

Posted by - March 3, 2022 0
महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी कॉंग्रेसने सत्तेचा आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्यात निदर्शने करण्याचा प्रयत्न…

गायक स्वप्नील बांदोडकर यांचं “सांग प्रिये” रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला

Posted by - March 17, 2022 0
गालावर खळी, राधा ही बावरी अशी उत्तमोत्तम गाणी गायलेल्या गायक स्वप्नील बांदोडकरनं आता ‘सांग प्रिये’ या नव्या म्युझिक अल्बमसाठी आवाज…

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकांना 14 दिवस सुट्टी; वाचा महत्त्वाची माहिती

Posted by - December 29, 2022 0
महत्वाची माहिती : नवीन वर्षामध्ये बँकांना कोणत्या दिवशी सुट्टी असणार आहे याची लिस्ट आता आरबीआयने जाहीर केली आहे. तर मग…
Electric Shock

Electric Shock : विजेचा शॉक लागून महावितरणच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 22, 2023 0
राजापूर : राजापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विजेचा शॉक (Electric Shock) लागून एका तरुणाला आपला जीव (Electric Shock)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *