Pune News

Pune News : पैसे परत न केल्याने सावकाराकडून पतीसमोरच पत्नीवर लैंगिक अत्याचार

1241 0

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune News) गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच पुण्यातच (Pune News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने एका व्यक्तीच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. यामध्ये हद्द म्हणजे या सावकाराने पतीसमोरच या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून हा तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला.या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सावकाराला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Nashik News : वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी भरपावसात काढली धिंड

काय आहे नेमके प्रकरण?
पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. एका 34 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. इम्तियाज हसीन शेख (वय 47) असे या प्रकरणातील आरोपी सावकाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तब्बल सहा महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

पीडित महिलेच्या पतीला आरोपीला इम्तियाज हसीन शेख याने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने त्याच्या पत्नीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. हा आरोपी (Pune News) एवढ्यावरच थांबला नाही त्याने या सगळ्याचा व्हिडिओ बनवून पुन्हा एकदा महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला. यानंतर आरोपीने हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन टाकले. या घटनेची माहिती मिळताच पीडितेने तात्काळ हडपसर पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Jagdish Mulik : वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक उपलब्ध करून देणार; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आश्वासन

Posted by - October 19, 2022 0
पुणे : शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता…

बच्चू कडूंना दिलासा ! 15 हजारांच्या जातमुचलक्यावर तात्पुरता जामीन मंजूर, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - March 8, 2023 0
२०१७ सालच्या एका आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या…
accident

धक्कादायक! नातेवाईकाच्या दहाव्यासाठी निघालेल्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

Posted by - May 12, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे इस्कॉन…

मराठवाड्यात थंडीचा मुक्काम वाढला, पुढच्या दोन दिवसात तापमान आणखी घसरणार

Posted by - February 9, 2022 0
औरंगाबाद- थंडीने राज्यातून काढता पाय घेतला असे वाटत असतानाच थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यातील तापमान एक…

राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती होणार !, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

Posted by - January 29, 2022 0
मुंबई- पोलीस दलात जाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *