Maruti Navle

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

637 0

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले (Maruti Navale) यांच्यावर पुणे पोलिसांनी फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नवले याच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलमधील दीडशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आले होते. मात्र, कपात रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे पीएफ विभागाच्या भविष्यनिधी निरीक्षक यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल एकनाथ कोकाटे (वय 51, रा. क्रिमसन क्रिस्ट सोसायटी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोकाटे भविष्य निर्वाह निधी विभागात अधिकारी आहेत. नवले हे सिंहगड सिटी स्कूल चे संस्थापक असून या शाळेमधील साधारण 116 कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर 2019 ते जून 2022 पर्यंतच्या मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात करण्यात आलेली आहे.ही रक्कम 74 लाख 68 हजार 636 एवढी आहे, मात्र, या रकमेतील 3 तीन लाख 75 हजार 774 रुपयांचीच रक्कम कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात आली. बाकी असलेली 70 लाख 92 हजार 862 रुपयांची रक्कम ही भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी वापरत कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केला.

मारुती नवले यांच्यावर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएफची रक्कम न भरणाऱ्या अनेक संस्था आणि कंपन्यांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. परंतु पुण्यातील नामांकीत शिक्षणसंस्थेविरोधात गुन्हा दाखल झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Solapur News : सोलापूर हादरलं ! पत्नी आणि मुलाची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! ससून रुग्णालयातील ‘तो’ कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Karad News : भीषण अपघात ! ऊसाच्या ट्राॅलीखाली 7 दुचाकी चिरडल्या

Nashik News : खळबळजनक ! जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलाचा सौदा; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Share This News

Related Post

Shobha Dhariwal

Shobha Dhariwal : रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन; शोभा धारीवाल

Posted by - February 28, 2024 0
पुणे : उद्योगाच्या उच्च शिखरावर विराजमान होऊनही माणिकचंद ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री रसिकलाल माणिकचंद धारीवाल (Shobha Dhariwal) यांनी नेहमीच…
Pune News

Pune News : आम आदमी पक्षाची “बसमित्र” संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पुढाकार

Posted by - December 7, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या तसेच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात…
Navi Mumbai News

Navi Mumbai News : छाती व श्वसनरोग विभागप्रमुखांना आला हार्ट अटॅक; 25 नामवंत डॉक्टर असतानादेखील कोणालाच वाचवता आले नाही

Posted by - August 7, 2023 0
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये डॉक्टरांची परिषद सुरू असतानाच हृदयविकाराचा तीव्र…

मग, मातोश्रीवर हल्ला करायचा होता; तेव्हा कळलं असतं… आ.दिलीप मोहिते यांचं वक्तव्य

Posted by - April 10, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर एस.टी कामगारांनी केलेल्या हल्ल्यांनंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान…

पुणे शहर प्लॉगेथॉनची एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमी नोंद

Posted by - June 6, 2022 0
    पुणे शहरात ‘पुणे प्लॉगेथॉन 2022′ चे आयोजन करण्यात आले होते. रविवारी झालेल्या पुणे प्लॉगेथॉन मेगा ड्राईव्ह अंतर्गत एकूण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *