Pune News

Pune News : चिल्ड्रन बँकेच्या नोटा देत हॉटेल व्यवसायिकाची 10 लाखांची फसवणूक

337 0

पुणे : रकमेच्या तीन पट नफा देतो, असे आमिष देत त्या बदल्यात चिल्ड्रन बँकेच्या छापील नोटा देऊन (Pune News) एका हॉटेल व्यवसायिकाची फसवणूक केल्या प्रकरणी निगडी पोलिसांनी एका टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आकाश शेटे व सचिन नरवडे नावाच्या दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच इतर फरार आरोपींचा सध्या शोध सुरू आहे.

निगडी येथील 28 वर्षीय हॉटेल व्यवसायिक शुभम सोनवणे यांची फसवणूक झाली आहे. सोनावणे यांना त्यांच्या ओळखीच्या असलेल्या आकाश शेटे व सचिन नरवडे यांनी आपल्याकडे काही पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. गुंतवलेल्या रकमेच्या तीन पट अधिक नफा देण्याचे अमिष दिले. फिर्यादींचे आरोपींबरोबर आधीपासून काही प्रमाणात ओळख असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून सोनवणे यांनी पैसे देण्याचे ठरवले. त्यांनी आकाश व सचिन यांना दहा लाखांची रोकड दिली व ठरलेल्या कालावधीनंतर रोख रकमेच्या स्वरूपात तीन पट पैसे दिले. हे पैसे घेऊन सोनवणे घरी गेल्यानंतर त्यांना या नोटा चिल्ड्रन बँकेच्या असल्याचे समजले.

त्यानंतर त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आकाश शेटे (वय वर्ष 30, राहणार आंबेगाव जिल्हा पुणे), सचिन नरवडे (वय 37 राहणार कदले रेसिडेन्सी, मोशी) यांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध निगडी पोलिसांकडून सुरू आहे. या गुन्ह्याबाबतची सविस्तर माहिती देताना निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी नागरिकांना जादा परताव्याच्या अमिषापासून दूर राहून फसवणूक टाळण्याचे आवाहन केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Virat Kohli : कोहली ‘विराट’ विक्रमापासून 1 पाऊल दूर; अशी कामगिरी करणारा ठरणार जगातील पहिला फलंदाज

Pune News : पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार : नारायण राणे

Manoj Jarange : चव्हाणांची गाडी अडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Loksabha Elections : पंतप्रधान मोदी, शाह महाराष्ट्रात फुंकणार प्रचाराचं रणशिंग; ‘या’ 2 मतदारसंघातून करणार सुरुवात

Urfi Javed : हाय गर्मी ! म्हणत एअरपोर्टवर उर्फीने काढले कपडे

Jalgaon News : विजेचा धक्का लागल्याने 11 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sassoon Hospital : उंदीर चावल्यामुळे तरुणाचा मृत्यू; ससूनमधील धक्कादायक प्रकार

Pune News : स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला देण्यात आला उजाळा

Gadchiroli News : गडचिरोलीत सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई; 8 माओवादी ठार

Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; 40 दिग्गजांचा समावेश

Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित

Water Supply : गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा असणार बंद; महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन

Sangli Accident : सांगलीमध्ये भीषण अपघात ! 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू

Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

Uttanasana : उत्तानासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे : उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - September 24, 2022 0
पुणे : देशाने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. देशाच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर निवडलेल्या क्षेत्रात समर्पित…

PUNE CRIME : खडकी भागात दहशत माजवणाऱ्या टोळक्यावर मोक्का अंतर्गत कारवाई; आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 106 वी काम कारवाई

Posted by - November 7, 2022 0
पुणे : खडकी भागामध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार सलमान नासिर शेख आणि त्याच्या…
Mansoon

4 जून रोजी भारतात दाखल होणार मान्सून; हवामान खात्याचा अंदाज

Posted by - May 31, 2023 0
पुणे : एल निनोच्या पार्श्वभुमीवर मान्सून तब्बल आठ दिवस उशीराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत…
Jalna Crime News

Jalna Crime News : मारहाण होत असताना नातेवाईकांना लावला फोन मात्र नातेवाईक येईपर्यंत सगळंच संपलं

Posted by - August 27, 2023 0
जालना : जालन्यातील (Jalna Crime News) भिलपुरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalna Crime News) अज्ञात कारणावरून…

#CRIME NEWS : हैदराबाद मधून पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देण्याचा धमकीचा फोन; विक्षिप्तपणाचा कळस !

Posted by - February 13, 2023 0
पुणे : पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडून देण्याच्या धमकीच्या फोन नंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *