Pune Fire : मध्यरात्री गंगाधाम फेज दोनमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून 5 जणांची सुटका

425 0

पुणे : काल मध्यरात्री 1.48 वाजता गंगाधाम फेज 02, विंग जी -05 येथे सातव्या मजल्यावर सदनिकेत आग (Pune Fire) लागल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द व मुख्यालयातून तीन फायरगाड्या व एक वाॅटर टँकर अशी एकूण 06 अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सात मजली इमारतीत सातव्या मजल्यावर चार खोल्या असलेल्या एका सदनिकेत आग लागली असून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला आहे. जवानांनी तातडीने वर धाव घेत होज पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा सुरु करत आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला तर त्याचवेळी आतमध्ये कोणी आहे का याची खात्री केली असता बाल्कनीमध्ये कुटूंबातील एकुण पाच जण अडकून पडल्याचे निदर्शनास आले. यामध्ये एक जेष्ठ महिला, एक दांपत्य व त्यांची दोन लहान मुले असून जवानांनी या सर्वांना सुखरुप बाहेर घेत त्यांची सुखरुप सुटका केली.

सुमारे तीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे कारण सदनिकेत पुढील खोलीमध्ये असणारया पेटत्या दिव्यामुळे लागली असा प्राथमिक अंदाज असून सदनिकेतील सर्व गृहपयोगी साहित्य पुर्ण जळाले असून मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाची मदत वेळेवर पोहोचल्याने जवानांनी आग इतरत्र पसरु न दिल्याने मोठा धोका टळला आहे. सदर इमारतीत असलेली स्थायी अग्निशमन यंत्रणा या घटनेवेळी कार्यान्वित नसल्याचे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले. या कामगिरीत अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके व प्रभारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास वीस जवानांनी सहभाग घेत पाच जणांचे जीव वाचविण्यात यश मिळवले.

सुखरुप सुटका केलेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे
1) महेश बाबुलाल ओसवाल – (41 वर्ष)
2) भक्ती महेश ओसवाल – (41 वर्ष)
3) ऊषा बाबुलाल ओसवाल – (61 वर्ष)
4) आहना महेश ओसवाल – (09 वर्ष)
5) आरव महेश ओसवाल – (05 वर्ष)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने पटकावले विजेतेपद

Rahul Gandhi : खळबळजनक ! राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

PCMC Drugs : ड्रग्स प्रकरणात बेईमान पोलीस अधिकाऱ्याला अटक

Loksabha 2024: महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार?

Vasai News : धक्कादायक ! वसईत स्कूल बसने दोन मुलींना चिरडलं

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ‘या’ जागांवर अजूनही एकमत नाही

Gautam Gambhir Quit Politics: PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल

Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Crime

पिंपरी चिंचवड मधील पर्यटकांवर दापोलीत हल्ला ;कोयत्याने केले वार

Posted by - May 16, 2022 0
दापोली- हर्णै समुद्र किनाऱ्यावर गाडी उभी करण्याच्या वादावरून पिंपरी चिंचवड मधील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने…
DRDO

Pradeep Kurulkar : कुरुलकर चक्क गेस्ट हाऊसमध्ये भेटायचा महिलांना; तपासात आले समोर

Posted by - May 12, 2023 0
पुणे : डीआरडीओचे (DRDO) संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. हनीट्रॅपमध्ये (Honey…
Dhule Bus Accident

Bike Accident : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Posted by - April 16, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक (Bike Accident) बातमी समोर आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या वरठाण…
Pune University Video

Pune University Video : खळबळजनक ! मार्कशीट देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून घेतली लाच

Posted by - August 27, 2023 0
पुणे : ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Pune University Video) भोंगळ कारभार पुन्हा एकदा…

Avinash Bhosale : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर

Posted by - May 18, 2024 0
मुंबई : येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosle)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *