Pune Crime News

Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?

870 0

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहरात पुण्यात 80 च्या दशकात भडकलेल्या टोळी युद्धानंतरच्या (Pune Crime) साडेचार दशकांत आतापर्यंत कुख्यात टोळ्यांच्या पाच म्होरक्यांचा भर रस्त्यावर खून करण्यात आला आहे. यामध्ये बाळू आंदेकर, मामा माळवदकर, अप्पा उर्फ प्रकाश लोंढे, संदीप मोहोळ आणि शरद मोहोळ यांचा समावेश आहे. या सगळ्यांची हत्या कशी झाली हे थोडक्यात जाणून घेऊया …

1) बाळू आंदेकर
बाळू आंदेकर याचा 17 जुलै 1984 रोजी भरदिवसा शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात प्रमोद माळवदकर आणि त्याच्या साथीदारांनी खून केला. या खुनानंतर खऱ्या अर्थाने शहरात टोळीयुद्ध भडकले आणि खुनांचे सत्र सुरू झाले होते. त्यात माळवदकरचे वडील, भाऊ, चुलते आणि एका मित्राचा खून झाला.आंदेकर टोळीतील एकाचा खून झाला.

2) प्रमोद माळवदकर
पुणे शहराच्या गुन्हेगारीत सुरुवातीला आंदेकर आणि माळवदकर या दोन टोळ्या सक्रिया होत्या. बाळू आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने प्रयत्न केले. मात्र, माळवदकर टोळीचा म्होरक्या प्रमोद माळवदकर 1997 मध्ये काळेवाडी येथे पोलिस चकमकीत ठार झाला.

3) मामा माळवदकर
प्रमोद माळवदकरच्या मृत्यूनंतर माळवदकर टोळी शहरातील गुन्हेगारीत फारशी सक्रिय नव्हती. मात्र, तरीही काही गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग होता. मामा माळवदकर टोळी चालवित होता. 26 फेब्रुवारी 2004 मध्ये मामा माळवदकर याचा सोमवार पेठेत धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला.

4) अप्पा उर्फ प्रकाश लोंढे
कुख्यात गुंड आणि पुणे जिल्ह्यातील वाळू माफिया अप्पा ऊर्फ प्रकाश लोंढेची 28 मे 2015 या दिवशी उरुळी कांचनजवळील शिंदवणे रस्त्यावर गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात 15 जणांवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते.

5) संदीप मोहोळ
टोळीच्या वर्चस्ववादातून गँगस्टर संदीप मोहोळ याचा 4 ऑक्टोबर 2006 रोजी पौड फाटा येथे गोळ्या घालून खून करण्यात आला. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी एकूण 18 जणांना अटक केली होती.

६) शरद मोहोळ
संदीप मोहोळच्या मृत्यूनंतर शरद मोहोळने टोळीची सूत्रे हातात घेतली. गेली काही वर्षे तो टोळी चालवित होता. शुक्रवारी 5 जानेवारी 2024 रोजी कोथरूड येथील सुतारदरा येथे गोळ्या झाडून हत्या केली.

पोलिसांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक या टोळीयुद्धाला लगाम घातला होता. शरद मोहोळचा झालेला खून ही भविष्यातील ‘मुळशी पॅटर्न गँगवॉर’ची नांदी ठरणार का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात पहिला गुन्हा दाखल

MS Dhoni : धोनीला त्याच्या जवळच्याचं मित्रांनी लावला 15 कोटींचा चूना

Buldhana News : कोयता अन् देशी कट्टा घेऊन संतप्त शेतकऱ्याची बाजार समितीत घोषणाबाजी

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू

IND W Vs AUS W : आज भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना रंगणार

Nagpur News : महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणं आणि ढकलणं हा विनयभंग होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना उडवले

Ajit Pawar : कोणी कोणाला निवडून आणलं हे जिंकणाऱ्यालासुद्धा माहिती; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Share This News

Related Post

Breaking !! धक्कादायक ! पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार, आरोपी फरार

Posted by - April 9, 2022 0
पुणे- पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा…

निलेश माझिरे पुन्हा मनसेत ! राज ठाकरेंनीच केली ‘या’ पदावर नियुक्ती

Posted by - June 9, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरु आहे. पक्षाचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे…
Pune Crime

Pune Crime : पत्नीने पतीला घाबरवण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतले मात्र तिचाच घात झाला

Posted by - September 22, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये छळास कंटाळून पेट्रोल ओतून घेतलेल्या महिलेला पतीने पेटवल्याची घटना…
BJP

#PUNE : कोण असणार कसबा मतदार संघाचा उमेदवार ? आज होणार घोषणा ? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु

Posted by - January 23, 2023 0
पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक साठणिक नेते इच्छुक आहेत. दरम्यान…
Nanded News

Nanded News : परभणीतील चिमुकल्याची नांदेडमध्ये क्रूरपणे हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

Posted by - September 9, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खंडणी न दिल्याने परभणी जिल्हातील एका 14 वर्षीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *