Rape

Pune Crime News : धक्कादायक ! उसने दिलेले पैसे परत न केल्याने अल्पवयीन मुलीवर आरोपींकडून अत्याचार

521 0

पुणे : शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षेतचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे न दिल्यानं एका 17 वर्षीय मुलीला 15 दिवस डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सगळा प्रकार मागील ऑक्टोबर 2023 पासून सुरू होता.

काय आहे संपूर्ण घटना?
पुण्यातील के. के. मॉलजवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली. ज्या लॉजवर हा प्रकार घडलाय, त्या सर्व लॉज मालकांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे वडील आजारी होते. त्यामुळं पीडित मुलीनं आरोपी दाम्पत्याकडून उपचारासाठी 30 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, काही कारणामुळं पीडित मुलीला ते पैसे परत देता येत नसल्यानं आरोपींनी 17 वर्षीय मुलीला ताब्यात घेतलं. त्यानंतर तिला एका लॉजवर नेत 15 दिवस डांबून ठेवलं.

यानंतर लॉजवर डांबून ठेवण्यात आलेल्या मुलीवर आरोपीनं वारंवार बलात्कार केला. यावरच न थांबता या दाम्पत्यानं तिला जीवे मारण्याची धमकी देत, तिला जबरदस्तीनं शरीरविक्री व्यवसाय करायला भाग पाडले. यातून येणाऱ्या पैशांतून आरोपींनी आपले पैसे वसूल केले. पुणे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ind Vs Eng 3rd Test : रोहित शर्माकडून कॅप्टन्सी पारी; राजकोटमध्ये ठोकलं टेस्टमधील 11 वं शतकं

Congress Rajyasabha : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

Babanrao Gholap : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Electoral Bond : सरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती आता सर्वसामान्यांना मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट

Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Share This News

Related Post

Viral Video

Viral Video : “पोरीला सासरी पाठवत नाही जा” म्हणत सासूने जावयाची चपलेने केली धुलाई

Posted by - August 6, 2023 0
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ (Viral Video) हसवणारे असतात तर काही व्हिडिओ रडवणारे…

सावित्रीबाई फुले यांची प्रतिकात्मक स्वरूपाची शाळा(व्हिडीओ)

Posted by - March 10, 2022 0
‘खामोशी से जब भर जाओगे, तभी थोडा चीख लेना, वरना मर जाओगे!’ स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त…

व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये समावेश; एकत्रित प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण

Posted by - January 14, 2023 0
पुणे : प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-११२ या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही…

सेवानिवृत्ती पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे उपोषण

Posted by - April 4, 2022 0
पुणे- कर्मचारी सेवेतून निवृत्त झालेले माझी कर्मचारी यांचे राज्य सरकारने अजून दर महिन्याला पेन्शन दिले नाही. त्यामुळे विविध कर्मचारी संघटना…

राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा करावा; अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्रींची भेट

Posted by - October 19, 2022 0
पुणे : यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *