Pune Crime

Pune Crime : खळबळजनक ! लष्कराच्या जवानाकडूंन ट्रॅफिक हवालदारावर प्राणघातक हल्ला

449 0

पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात वाहतुकीचे नियम अनेकदा पायदळी तुडवले जातात. या सगळ्यांना आळा घालण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. पण एका वाहतूक पोलिसाला नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे चांगलेच महागात पडलं आहे. बाईकवर ट्रिपल सीट जाणाऱ्यांना अडवल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर आरोपींकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पीडित पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

पोलीस हवालदार रोमेश धावरे (33) यांनी 4 सप्टेंबर रोजी लष्करी जवान वैभव संभाजी मनगटे (25) याला महिन्याभरापूर्वी बाईकवरून ट्रिपल सीट प्रवास केल्याबद्दल चालान कापले होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. जवानाच्या मनात हवालदार रोमेश धावरे याच्या विरोधात राग होता. त्याच रागातून वैभव मनगटेने रोमेश यांच्यावर सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला केला. हा हल्ल्यात हवालदार रोमेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

पोलिसांनी याप्रकरणी मनगटेवर खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पुण्यातील बुधवार चौकात घडलेल्या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली. धावरे हे पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या फरासखाना वाहतूक विभागात कार्यरत आहेत. मनगटे सध्या जोधपूर येथे तैनात आहे. तो सप्टेंबरपासून पुण्यात वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या एका लष्करी जवानासोबत कर्तव्यावर आहे. वैभव संभाजी मनगटे हा मूळचा ल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ गावचा रहिवासी आहे.

घटनेच्या दिवशी नेमके काय घडलं ?
“4 सप्टेंबर रोजी धावरे यांनी मनगटे याला बाईकवरून ट्रिपल सीट प्रवास केल्याबद्दल चालान बजावले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धावरे हे बुधवार चौकात कर्तव्यावर असताना पाठीमागून आलेल्या मनगटे त्यांच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने वार केले. या घटनेनंतर मनगटे याला अटक करण्यास आली. तर धावरे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. धावरे यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे पण स्थिर आहे. अशी माहिती फरासखाना पोलिसांकडून देण्यात आली आहे. या हल्ल्याप्रकरणी आरोपी मनगटे विरोधात भारतीय दंड संहिता कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 333 आणि 353 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण विषयक कायद्यावर आधारीत चर्चासत्राचे आयोजन

Posted by - July 8, 2022 0
पुणे: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, लायन्स क्लब ऑफ पुणे विधीज्ञ, सागर मित्र, बार असोसिएशन ऑफ…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांच्या हस्ते बारामती पॉवर मॅरेथॉनचा शुभारंभ

Posted by - November 26, 2023 0
बारामती : आज बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’ स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार…

एसआरए गृह प्रकल्पाला अतिरिक्त एफएसआय, ५४२ झोपडट्टीवासीयांना दिलासा

Posted by - March 9, 2022 0
पुणे- पुणे शहरातील एसआरए मधील नवीन गृह प्रकल्पांना अतिरिक्त एफएसआय वाढवून मिळावा अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने…
Murlidhar mohol

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Posted by - January 27, 2022 0
पुणे- राज्यासह पुणे शहरात देखील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढ होताना दिसून येत आहे. सामान्य नागरिकांपासून ते स्थानिक लोकप्रतिनिधी, बॉलिवूड स्टार्स,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *