Pune Crime

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

874 0

पुणे : आरोपी (Pune Crime) कितीही शातीर असला तरी कोणती ना कोणती चूक तो करत असतो. आपल्यात एक म्हण आहे भगवान के घर मै देर है पर अंधेर नही. याचाच प्रत्यय पुण्यातील एका घटनेमध्ये आला आहे. यामध्ये एका हत्या प्रकरणात आरोपीला शोधण्यात पुणे पोलिसांना तब्बल 10 वर्षांनी यश आले आहे. संतोष कातोरे असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी 2017 मध्ये अटक केली आहे. चला तर मग जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं काय आहे?

अर्चना सांगळे कोण होती?
अर्चना सांगळे ही पुणे येथे राहत होती. अर्चनाचा विवाह एका नोकरदार तरुणाशी झाला होता. या नात्यात बांधल्यानंतर अर्चना आणि तिचा पती दोघेही आनंदात होते. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. या दोघांचे एकमेकांशी न पटल्याने अर्चना पतीपासून वेगळी राहू लागली. यादरम्यान अर्चनाची ओळख संतोष कातोरे या व्यक्तीशी झाली. यानंतर या दोघांचे एकमेकांवर प्रेम जुळले. यानंतर त्या दोघांनी मिळून पुण्यातील बाणेर भागात फ्लॅट विकत घेतला होता. त्या फ्लॅटवर अर्चना व संतोष 15 डिसेंबर 2005 पासून एकत्र राहू लागले. पण त्यानंतर अर्चना 4 नोव्हेंबर 2006 रोजी अचानक बेपत्ता झाली. तिचा कुठेच पत्ता लागला नाही.

यानंतर आपली मुलगी बेपत्ता झाल्याची झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केली. यादरम्यान तपास करत असताना पोलिसांना मच्छिंद्रगड येथे अर्चना हिचा मृतदेह सापडला. तिची गळा आवळून हत्या केल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले. यानंतर पोलिसांनी अर्चनासोबत राहणारा तिचा प्रियकर संतोष कातोरेला ताब्यात घेतले, व त्याच्याकडे चौकशी केली. मात्र त्यामधून काहीच निष्पन्न झाले नाही. त्याच्याविरुद्ध असा कोणताही पुरावा किंवा सुगावा पोलिसांना मिळू शकला नाही. त्यामुळे अखेर संतोषला पोलिसांनी सोडून दिले.

आरोपी असा अडकला जाळ्यात
अर्चना सांगळे व संतोष कातोरे हे बाणेर येथे ज्या फ्लॅटवर राहत होते, तो फ्लॅट अर्चना व संतोष या दोघांच्या नावावर होता. संतोषने 6 फेब्रुवारी 2012 मध्ये हा फ्लॅट अर्चना सांगळे म्हणून एक डमी महिला उभी करून स्वतःच्या नावावर करून घेतला. त्यानंतर या फ्लॅटची विक्री केली हिकडेच तो फसला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास करत असताना अर्चना सांगळे हिच्या खुनाचादेखील उलघडा झाला. पोलिसांच्या तपासात फ्लॅटच्या वादातूनच संतोषने अर्चना हिचा खून केल्याचं समोर आलं. संतोषनं बनावट कागदपत्रांवर फ्लॅट त्याच्या नावावर कसा केला, याचा तपास पोलीस करत होते. याप्रकरणी पोलिसांनी संतोष कातोरे याला चौकशीसाठी बोलावले. त्याची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा मान्य केला.

का केला खून?
‘मी आणि अर्चनाने 2005 मध्ये तो फ्लॅट घेतला होता. यात अर्चनानं मोठी रक्कम दिली होती. मात्र नंतर मला नफ्यासाठी तो फ्लॅट विकायचा होता. पण अर्चना तसे करण्यास नकार देत होती. यावरून आमच्यात सातत्यानं भांडण होत होती.’ यामुळे मी अर्चनाचा खून केला असे आरोपी संतोषने कबूल केले.

कसा केला खून?
4 नोव्हेंबर 2006 रोजी देवदर्शनासाठी जाण्याचा बहाणा करून संतोषने अर्चना हिला कोल्हापूर येथे नेलं होतं. कोल्हापूर येथून येताना संतोषनं अर्चना हिचा एका निर्जनस्थळी गळा आवळून खून केला. त्यानंतर संतोषनं अर्चनाचा मृतदेह मच्छिंद्रगड किल्ल्यात टाकून दिला होता. बरीच वर्षे या खुनाचा तपास लागत नव्हता. मात्र 10 वर्षांनी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्याने पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : राज्य सरकारमध्ये अर्थखातं कसं मिळालं? अजित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

Pune Accident : एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात; 5 विद्यार्थी जखमी

Women’s Reservation : महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Beed News : ‘या’ कारणामुळे प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा

Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी

Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस

Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Share This News

Related Post

CM EKNATH SHINDE

CM Eknath Shinde : अजित पवारांच्या बंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये…
Ahmednagar News

Ahmednagar News : कुटुंब हळहळलं ! वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण सरावादरम्यान घडली दुर्दैवी घटना

Posted by - February 17, 2024 0
अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन…
Pune News

Pune News : खळबळजनक ! पुण्यात मेट्रोच्या खोदकामादरम्यान 2 हँडग्रेनेड आढळले

Posted by - December 4, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये मेट्रोसाठी सुरू असलेल्या खोदकामात जुना हँडग्रेड आढळला आहे.…

गौरवास्पद ! न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्याच्या नावाने अमेरिकेत पुरस्कार

Posted by - May 24, 2022 0
पुणे- स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम व सुजाण नागरिक घडविण्यासाठी कार्यरत असलेल्या टिळक रस्त्यावरील न्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *