Sarthak Kamble

Pimpri-Chinchwad : महानगरपालिकेच्या शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू; पिंपरी- चिंचवडमधील घटना

468 0

पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचवडमधील चाफेकर विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. सार्थक कांबळे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो तिसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या पायऱ्यावरील लोखंडी ग्रीलवरून घसरत खाली येत होता. तू तोल जाऊन पडशील अस मित्राने म्हटल तेवढ्यात तो तिसऱ्या मजल्यावरून आतील बाजूस डक्टमध्ये पडला.

काय आहे संपूर्ण घटना?
हुतात्मा चापेकर विद्यामंदिर ही महानगरपालिकेची शाळा आहे. ही घटना दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक कांबळे हा इतर मित्रांसह तिसऱ्या मजल्यावर थांबला होता. पायऱ्याजवळ असलेल्या लोखंडी ग्रीलवर आतील बाजूस पाय करून सार्थक बसला. त्याच्या मित्रांनी त्याला अस बसू नकोस, तू खाली पडशील असं म्हणताच सार्थकचा तोल गेला आणि तो खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या सार्थकला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

माझा मुलगा मला परत द्या, वडिलांचा आक्रोश
शाळेवर कठोर कारवाई करा आणि माझा मुलगा मला परत द्या. अशी मागणी सार्थकच्या वडिलांनी केली आहे. तसेच घडलेल्या घटनेची पालिकेकडून चौकशी केली जाणार आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आल्याची माहिती, पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन; पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

Rahul Shewale : ‘ती चूक आम्ही करणार नाही’; राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Ashok Chavan : ‘…म्हणून मला भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली’; अशोक चव्हाणांनी केले स्पष्ट

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

Share This News

Related Post

Heatstroke

Pune News Update : पुण्यात रेकॉर्ड ब्रेक तापमान! तापमानाचा पारा 42 वर; पुणेकर झाले हैराण

Posted by - April 29, 2024 0
Pune : पुण्यात उन्हाचा पारा 42 अंशावर पोहोचला आहे. आज पुण्याच्या यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. आज कोणाचा…

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन

Posted by - August 1, 2022 0
पुणे : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त रा.स्व. संघाच्या वतीने पुणे महानगरात विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन…
Vasant More

Vasant More : ‘…तर मनसेचा पहिला खासदार मीच असेल’; वसंत मोरेंचे वक्तव्य

Posted by - September 3, 2023 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. काही आठवड्यांपूर्वीच बारामती…
Palghar Accident

Palghar Accident : दिवाळीला लेकरांसोबत फटाके फोडायचं राहूनच गेलं; पालघरमध्ये मजुरांच्या गाडीचा भीषण अपघात

Posted by - November 10, 2023 0
पालघर : शुक्रवारपासून देशभरात दिवाळीला सुरुवात झाली आहे.त्यामुळे अनेक लोक दिवाळीसाठी आपल्या घराकडे जाताना दिसत आहेत. परिणामी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात…

Worli Hit and run | जुहू मधील बारमध्ये मद्य सेवन, नशेत लॉन्ग ड्राईव्ह अन् वरळीत अपघात… वाचा अपघाता आधीचा संपूर्ण घटनाक्रम

Posted by - July 7, 2024 0
Worli Hit and run | जुहू मधील बारमध्ये मद्य सेवन, नशेत लॉन्ग ड्राईव्ह अन् वरळीत अपघात… वाचा अपघाता आधीचा संपूर्ण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *