Pimpari Chinchwad Crime

Pimpri-Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

556 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad Crime) पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये वंशाचा दिवा म्हणजे मुलगा होत नसल्याने दुसऱ्या विवाहाचा विचार करणाऱ्या पतीची पत्नीने सुपारी दिली. पत्नी रत्ना मिठाईलाल बरुड, शिवम दुबे आणि अमन पुजारी अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी रत्ना आणि मिठाईलाल बरुड हे दाम्पत्य पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात राहतं. या दांपत्याला एकूण आठ मुली असून पैकी एका मुलीचा मृत्यू काही महिन्यांपूर्वी झाला. मिठाईलालला सात मुली असल्याने मुलाची अपेक्षा होती, त्याला वंशाचा दिवा हवा होता. या कारणावरून तो पत्नी रत्नाचा मानसिक आणि शारीरिक छळ नेहमी करायचा. काही दिवसांपासून मिठाईलालच्या मनात वंशाचा दिवा हवा असल्याने दुसरा विवाह करण्यासंबंधी विचार येत असायचा. याची माहिती पत्नी रत्नाला मिळाली आणि रत्नाने पती मिठाईलालची हत्या करण्याचं ठरवलं. पत्नीने नोव्हेंबर महिन्यापासून या हत्येची प्लॅनिंग केली होती. यासाठी तिने आरोपींना अ‍ॅडव्हान्स म्हणून दोन लाख रुपये दिले होते.

घटनेच्या दिवशी काय घडले?
घटनेच्या दिवशी रात्री 9 च्या सुमारास रत्ना शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली. तेव्हा, तिने अमन पुजारी ला फोन करून पती आतील बेडरूम मध्ये झोपला असल्याची माहिती दिली. रत्नाने आधीच घरातील टीव्ही जवळ धारदार कोयता आणून ठेवला होता, तर रत्नाने दिलेल्या पैशातून अमन पुजारीने चाकू विकत घेतला होता. अमन आणि शिवम थेट घरात शिरले आणि त्यांनी बेसावध असलेल्या मिठाईलालवर सपासप तब्बल 20 ते 21 वार केले. पाठीतून पोटात चाकुने भोकसले, चेहऱ्यावर, हातावर वार केले. घरात मुली असल्याने मुलींनी हा सर्व थरार बघून आरडाओरडा केला. यानंतर आरोपी घाबरून घटनास्थळावरून फरार झाले.

गंभीर असलेल्या मिठाईला तातडीने मुलींनी इतर नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं. मारेकर्‍यांना रत्नाच्या मुलीने पाहिलं होतं त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिने स्पष्ट त्यांची नावे घेतली. काही तासांमध्येच दोघांनाही निगडी पोलिसांनी अटक केली. यानंतर निगडी पोलिसांनी आपला हिसका दाखवताच रत्नानेच पती मिठाईलाल ला जीवे ठार मारण्याची सुपारी दिल्याचे समोर आले. दुसरं लग्न आणि सात मुली असल्याने होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळातून सुपारी दिल्याचे आरोपी पत्नीने कबूल केले. पोलीस उपनिरीक्षक नाथा केकान या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Loksabha Security Breach : संसद भवनाच्या घटनेनंतर 7 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Share This News

Related Post

FIR

Pune News : RTO कार्यालयामधील राड्याप्रकरणी केशव क्षीरसागर, अजय मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल

Posted by - February 24, 2024 0
पुणे : पुणे (Pune News) आरटीओत तुंबळ हाणामारी करत, राडा घालणार्‍या टॅक्सी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात…
Suhas Diwase

Pune News : बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी 7 मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Posted by - May 4, 2024 0
पुणे : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता (Pune News) मंगळवार 7 मे रोजी मतदान होत असून मतदारसंघातील सर्व आस्थापनांनी…

मोठी बातमी : मोहसीन शेख हत्या प्रकरणातील हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई आणि 20 आरोपींची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - January 27, 2023 0
पुणे : 2014 साली घडलेल्या मोहसीन शेख हत्या प्रकरणातील हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई आणि 20 आरोपींची निर्दोष मुक्तता…
Pune Crime News

Pune Crime News : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; पुण्यातील चंदननगरमधील घटना

Posted by - August 24, 2023 0
पुणे : कौटुंबिक वादातून महिलेवर पतीने चाकुने वार केल्याची घटना खराडी (Pune Crime News) परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे आपल्या…
Nashik News

Nashik News : हृदयद्रावक ! सख्ख्या बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 2, 2024 0
नाशिक : नाशिकच्या (Nashik News) सिन्नर तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये चिमुकल्या बहीण भावाचा पाण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *