Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! प्रेयसीच्या ‘त्या’ कृत्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात तरुणाच्या अंगावर कार घातली

340 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात काल मध्य रात्री एकच्या सुमारास यशवंत नगर येथील शंकर चौधरी चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये एका तरुणाने आपली प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचं पाहून मुलाच्या अंगावरती चार चाकी घातली. यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

या घटनेमध्ये दुचाकीस्वार मुलगा जखमी झाला असून त्याच्यावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय सी एम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सुशील काळे असे अंगावर चारचाकी गाडी घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे तर निलेश शिंदे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आपली प्रेयसी निलेश शिंदे या तरुणासोबत बोलत थांबल्याचे पाहून राग अनावर झाल्याने सुशील काळेने आपली चार चाकी गाडी निलेश शिंदे यांच्या अंगावर घातली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी सुशील काळे यांच्या विरोधात 307 अंतर्गत खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

रमणबाग प्रशालेत मराठी दिन साजरा

Posted by - February 27, 2022 0
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मराठी भाषा दिन आणि शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या…
Govindbagh

Pune News : पवार समर्थकांनी गोविंदबाग फुलली; शरद पवार, सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांकडून स्वीकारल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Posted by - November 14, 2023 0
पुणे : देशभरात अनेक मान्यवर कुटुंबीय आपापल्या पद्धतीने दिवाळी पाडवा सण साजरा करतात. मात्र बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबीयांकडून साजरा…
Ratnagiri News

Ratnagiri News : कुटुंब हळहळलं ! खेळत असताना अंगावर गरम पाणी पडल्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 14, 2023 0
रत्नागिरी : लहान मुले बाहेर खेळताना (Ratnagiri News) किंवा घरातही खेळताना त्यांच्यावर अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे असते. अन्यथा तुमचे…

पुणे शहरातील स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा सक्रिय सहभाग

Posted by - January 8, 2023 0
पुणे : पुण्यात होत असलेल्या जी २० परिषदेच्या निमित्ताने जनजागृती त्याचबरोबर नागरिकांच्या सहभागातून सार्वजनिक स्वच्छता करण्याच्या हेतूने पुणे महापालिकेतर्फे आज…

यूटर्न घेताना झालेल्या अपघातात मायलेकरांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 27, 2023 0
नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील छावणी परिसरातील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *