Nashik Copy

मुन्नाभाई स्टाईल कॉपी करणाऱ्या पठ्ठ्याला नाशिक पोलिसांकडून अटक

2242 0

नाशिक : काही लोक परीक्षेत कॉपी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत असतात. नाशिकमध्ये तर एका पठ्ठ्याने मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात मुन्नाभाई जशी कॉपी करतो तशी कॉपी केली आहे. हा सगळा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लिपिक आणि इतर पदांच्या भरतीसाठी नाशिकमध्ये रविवारी घेतलेल्या परीक्षेदरम्यान ही घटना घडली आहे. या आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

बटन कॅमेरा आणि ब्लूटूथ या तंत्रज्ञानाच्या साह्याने ही कॉपी करण्यात आली. या प्रकरणी परीक्षा देणारा मूळ उमेदवार, त्याच्या जागी परीक्षा देणाऱ्या डमी परीक्षार्थी आणि उत्तर पुरवणारा अशा तीन संशयिताविरोधात नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. नाशिक रोड येथील आर्टिलरी सेंटर भागातील फ्युचर टेक सोल्युशन केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती.

अर्जुन मेहेर या परीक्षार्थीच्या जागेवर राहुल नागलोथ या डमी उमेदवाराने परीक्षा दिली, त्याने बटन कॅमेरा आणि ब्लूटूथ च्या साह्याने प्रश्नपत्रिका फोटो बाहेर पाठवला आणि केंद्राबाहेर उभ्या असलेल्या अर्जुन राजपूत याने प्रश्नांची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी राजपूत आणि नागलोथ या दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरूवात केली आहे.

Share This News

Related Post

‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’ कडेच! भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Posted by - December 9, 2022 0
पुणे : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे.…
Mountaineering Institute

Mountaineering Institute : राज्यात होणार स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट खा. अमोल कोल्हेंची ट्विटरद्वारे माहिती

Posted by - June 20, 2023 0
पुणे : आता आपल्या महाराष्ट्रात पर्वतारोहणसारखे साहसी खेळ शिकवणारी स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट (Mountaineering Institute) सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे…

CRIME NEWS : भर दहीहंडीच्या उत्सवामध्ये सिंहगड रोडवर टोळीयुद्ध ; फायरिंग … पूर्ववैमानस्यातून कोयत्याने वार !

Posted by - August 20, 2022 0
पुणे : पुणे शहरामध्ये शुक्रवारी दहीहंडीचा उत्सव एकीकडे जोरदार साजरा केला जात असतानाच , एक धक्कादायक घटना घडली आहे .…
Ajit Pawar

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश; अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - January 27, 2024 0
सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आज यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *