Nanded Crime

Pigs Attack : नांदेडमध्ये डुकरांच्या हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; एक दिवस आधीच मिळाला होता डिस्चार्ज

497 0

नांदेड : काही दिवसांपूर्वी नांदेड शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मृत्यू प्रकरण देशभर गाजलं होतं. 24 तासात 24 मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या रुग्णालयाच्या परिसरात आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय परिसरात एका तरुणाचा डूकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
नांदेड शहराजवळच्या धनगरवाडी येथील 32 वर्षीय तुकाराम कसबे या युवकाचे डुकराच्या कळपाने लचके तोडले. यात त्याचा मृत्यू झाला आहे. मयत तरुणाला क्षयरोग होता. अकरा दिवस तो शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. गेल्या 9 तारखेला त्याला उपाचारानंतर सुट्टी देण्यात आली होती. आज सकाळी त्याचा मृतदेह रूग्णालय परिसरात आढळला. तो शौचालयाला गेला होता. त्याच वेळी त्याच्यावर डुकराच्या कळपाने हल्ला करत लचके तोडले. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Mumbai Crime News

Mumbai Crime News : दारु देण्यास नकार दिल्याने ग्राहकाने थेट पिस्तुलच काढलं; मुंबईमधील पबमध्ये जोरदार राडा

Posted by - October 14, 2023 0
नवी मुंबई : नवी मुंबईत (Mumbai Crime News) एपीएमसी इथं असलेल्या सेवन स्काय पबमध्ये काही ग्राहकांनी राडा घातल्याची घटना समोर…
Pune Crime News

Pune Crime News : मुंबई पुणे हायवेवर बनावट दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Posted by - January 30, 2024 0
पुणे : पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे. जुना मुंबई पुणे हायवेवर राज्य…

नारायण राणे यांचे ट्विट, ‘शाब्बास एकनाथजी… नाही तर तुझा आनंद दिघे झाला असता’

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- स्वतः शिवसेनेतून बाहेर पडलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या भूमिकेत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले…
Manoj Jarange

Maratha Reservation : आधी ‘ती’ मागणी मान्य करा अन् नंतरच..; अधिवेशनापूर्वी जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका

Posted by - February 20, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आज राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मात्र या अधिवेशनापूर्वीच मराठा आंदोलक मनोज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *