फोन बंद, घर बंद… IAS पूजा खेडकर यांचं कुटुंब फरार ? पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू

373 0

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. पूजा खेडकर यांचे कुटुंबीय फरार झालेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, गेल्या दोन दिवसांपासून खेडकर कुटुंबीयांशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊन शकलेला नाही, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. खेडकर कुटुंबीयांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे. खेडकर कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलवायचे आहे मात्र कुटुंबातील कोणाशीच पोलिसांचा संपर्क होत नाहीये. विविध प्रकरणांची चौकशी आणि तपास करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांना पोलीस संपर्क करत आहेत. मात्र खेडकर कुटुंब सध्या नेमके कुठे आहे याची माहिती मिळत नाहीये.

दरम्यान दोन दिवसांपासून या सर्वांचे मोबाईल देखील स्विच ऑफ लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आज पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने खेडकर यांच्या घरी जाऊन बंगल्याचा चित्रीकरण देखील केले. काल देखील पोलिसांचे एक पथक खेडकर यांच्या घरी चौकशीसाठी गेले होते, मात्र कालही कुटुंबातील कोणीही घरात नव्हते त्याचबरोबर बंगल्या बाहेरचे गेट ही बंद असल्यामुळे आत जाऊन तपास करणे पोलिसांना शक्य झालेले नाही. त्यामुळेच खेडकर कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेकडून तीन पथकेही तयार करण्यात आल्याची माहिती समोर येते.‌

Share This News

Related Post

Pune Breaking

Pune News: पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा हैदोस; महिला पोलिसांसमोरच कोयता व तलवारीने माजवली दहशत

Posted by - December 28, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पुण्यातील वडगाव शेरीत कोयता व तलवारसह दोन टोळीमध्ये…
Jalgaon Accident

Jalgaon Accident : ओव्हरटेकच्या नादात रिक्षाचा अपघात; 1 ठार तर 7 जखमी

Posted by - August 24, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon Accident) ओव्हरटेकच्या नादात ओमनी गाडीने रिक्षाला धडक दिल्याने…

महत्वाची बातमी : रिक्षा चालकांच्या आंदोलनाला यश ; पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सी कंपनीला सेवा बंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश !

Posted by - January 13, 2023 0
पुणे : पुण्यातील रॅपिडो कंपनीला हायकोर्टाने सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे, असे म्हणायला…

पुण्यातील धक्कादायक घटना ! सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा बेदम मारहाण करून खून

Posted by - June 29, 2022 0
पुणे- सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा बारच्या…

विद्यापीठ अधिसभेचा आज निकाल : मतमोजणीचे विद्यापीठाकडून सूक्ष्म नियोजन; खाशाबा जाधव क्रीडासंकुलात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी

Posted by - November 22, 2022 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून यासाठी सर्व तयारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *