Parbhani Suicide

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

704 0

परभणी : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आव्हई या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोचना ज्ञानेश्वर पवार (वय 32) (Lochana Dnyaneshwar Pawar) असे आत्महत्या (Suicide) करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
लोचना यांचा आव्हई येथील ज्ञानेश्वर उध्दव पवार यांच्यासोबत 12 वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन अपत्य देखील झाली. मात्र, मागच्या काही दिवसापासून लोचना यांच्या पतीला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे पती कामधंदा न करता “माहेरहून पैसे घेऊन ये”, असे म्हणत विवाहितेला मारहाण करण्यात आली. लोचना यांना सासू-सासरे यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. मृत लोचना यांनी या त्रासाला कंटाळून काही महिन्यांपूर्वी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

यानंतर नातेवाईकांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटवलं होतं. मात्र, या घटनेनंतरही सासरकडील मंडळींकडून होणारा त्रास सुरूच राहिला. अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून लोचना यांनी आपल्या राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. मृत महिलेच्या मुलाने ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. ही घटना उघडकीस येताच पती ज्ञानेश्वर, सासु सखुबाई, सासरा उध्दव श्रीपती पवार हे गावातून पसार झाले. पोलीस निरिक्षक सुभाष मारकड, साहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड, साहाय्यक पोलीस उपनिरिक्षक चव्हाण, जमादार अमर चाउस यांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News

Related Post

ST Employees

ST Employees : एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - February 28, 2024 0
मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मान्यता प्राप्त एसटी कामगार (ST Employees) संघटनांचं आंदोलन सुरू होतं, अखेर या…
Sanjay Raut

Sanjay Raut : लोकसभेत मविआ 48 पैकी ‘एवढ्या’ जागा जिंकेल; संजय राऊतांनी वर्तवले भाकीत

Posted by - April 5, 2024 0
मुंबई : 2024 या लोकसभा निवडणुकीला (Loksabha) सुरुवात झाली असून देशात या निवडणुका 7 टप्प्यात घेतल्या,जाणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये…
Selfie

Selfie : सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; 4 तरुणांचा दुर्दैवी अंत

Posted by - July 17, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आठ पर्यटक तरुणांना सेल्फी (Selfie) काढण्याचा मोह जीवावर बेतला आहे. यादरम्यान…
Scan UPI

आता कार्ड न वापरता एटीएममधून काढता येतील पैसे, ‘या’ बँकेनं सुरू केली सुविधा

Posted by - June 8, 2023 0
काय सांगता डेबिट कार्ड (Debit Card) घरी विसरलात आणि ATM मधून पैसे काढायचे आहे.मात्र आता चिंता करू नका.कारण ATM मधून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *