Parbhani Crime

Parbhani Crime : परभणी हादरलं ! पळून लग्न केल्यानंतर पुन्हा आई-वडिलांकडे राहायला गेल्याने पत्नीची भररस्त्यात हत्या

521 0

परभणी : परभणी जिल्ह्यातून (Parbhani Crime) एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान एका शाळकरी विद्यार्थिनींवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने परभणी हादरलं आहे. जिंतुर तालुक्यातील बोरी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दुर्दैवाने तरुणीचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाहीतर हा हल्ला केल्यानंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
सदर तरुणी ही बोरी येथील संभाजी नगर येथे वास्तव्यास होती. बोरी येथील एका शाळेत ती 9 वीच्या वर्गात शिकते. बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील वस्तीतून शाळेत जात असताना आरोपीने या विद्यार्थिनींला गाठून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसाढवळ्या तरुणीवर हल्ला झाल्याने आणि ते ही शाळेच्या परिसरात यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

विशेष बाब म्हणजे, तरुणीवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी हा हल्ला करून स्वतःहून बोरी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यावेळी त्याने आपले या तरुणी बरोबर लग्न झालं असल्याचा दावा त्याने केला. आम्ही दोघे पती -पत्नी असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. तसंच, आम्ही दोघांनी यापूर्वी सोबत संसार केल्याचा हा दावा त्याने केला आहे. तसा एक फोटोही आरोपीने सादर केला आहे. पण त्याने तरुणीवर हल्ला का केला हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. रोहित गायकवाड असं आरोपीचे नाव असून तो धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील असल्याचे समोर आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Navi Mumbai : मोबाईल वर बोलला आणि जिवानिशी मुकला! काय घडले नेमके?

Bhandara Video : आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या बैलगाड्याने थेट आजोबांना उडवले; व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Share This News

Related Post

Bus Accident

Bus Accident : प्रवाशांनी भरलेली भरधाव बस नदीत कोसळली; 6 जणांचा मृत्यू

Posted by - August 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडमधील गिरिडीहमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी दुर्घटना (Bus Accident) घडली आहे. यामध्ये प्रवाशांनी भरलेली आणि…

जंगली महाराज रोड वरील रॉबरीची शिवाजीनगर पोलीसांकडुन 24 तासात उकल

Posted by - February 5, 2024 0
दि. 02 फेब्रुवारी  रोजी पहाटे 03.30 वा. च्या सुमारास कॅब ड्रायव्हर व प्रवासी जात असताना चार अनोळखी इसमांनी गाडी अडवुन…

पुनीत बालन ग्रुपच्या ऋतुजा भोसलेने आशियाई स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

Posted by - October 2, 2023 0
पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक जमा झाले आहे. पुनीत बालन ग्रुपच्या रुतुजा भोसले हिने…

CRIME NEWS : तंबाखूच्या व्यसनापायी आईचीच केली निघृण हत्या; आरोपी मुलगा…

Posted by - November 16, 2022 0
पुणे (जुन्नर) : जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलांनाच आपल्या जन्मदात्रीच्या डोक्यात…

गॅस गिझर गळतीने एअर इंडियाच्या महिला सिनिअर पायलटचे दुर्दैवी निधन

Posted by - February 7, 2022 0
नाशिक- गॅस गिझरच्या गळतीमुळे एअर इंडियाच्या महिला सिनिअर पायलटचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नाशिकमध्ये घडली आहे. रश्मी गायधनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *