सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्ती प्रकरणी परमबीर सिंह यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

491 0

मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांचा दबाव होता असा धक्कादायक खुलासा ईडी समोर दिलेल्या जबाबामध्ये केला आहे. परमबीर सिंग यांच्या खुलाशामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिली होती असा जबाब परमबीर सिंह यांनी ईडीला दिला आहे. त्याशिवाय बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब स्वत: घेऊन येत असल्याचेही परमवीर सिंह यांनी म्हटले आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती समोर आली आहे.

अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवला होता. सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात रुजू करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना परमबीर यांनी धक्कादायक माहिती दिली. सचिन वाझे याला जून 2020 मध्ये पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत रुजू करण्यात आले होते. निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस दलात रुजू करुन घेण्याच्या निर्णयासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि काही अधिकारी होते. हे सर्वजण संबंधित समितीचे सदस्य होते.

या बैठकीच्या दरम्यान सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. त्याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची थेट सूचना होती असेही परमबीर यांनी ‘ईडी’ला सांगितले.

Share This News

Related Post

पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती नाही ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचं स्पष्टीकरण

Posted by - April 1, 2022 0
पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल…

MAHARASHTRA POLITICS : ठाकरे गटाला आणखीन एक धक्का; दिपाली सय्यद करणार शिंदे गटात प्रवेश

Posted by - November 9, 2022 0
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्या शिंदे…
jofra archer

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! जोफ्रा आर्चर IPLमधून बाहेर; तर ‘या’ खेळाडूची झाली एंट्री

Posted by - May 9, 2023 0
मुंबई : यंदाच्या आय़पीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians)आपल्या फॉर्मला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे कर्णधार रोहित शर्माचा (Rohit…
Gujrat Viral Video

Gujrat Viral Video : जय श्रीरामचा नारा देण्यास सांगत टोळक्याकडून मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण

Posted by - August 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये (Gujrat Viral Video) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जय श्री रामचा नारा देण्यास…

शरद पवार यांनी नकार दिल्यास राष्ट्रपतीपदासाठी राजकीय परिघाबाहेरील उमेदवार निवडावा, शिवसेनेची भूमिका

Posted by - June 15, 2022 0
नवी दिल्ली- केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *