PUNE CRIME : एकतर्फी प्रेमातून त्याने बनवला ‘खोटा निकाहनामा’ ; मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यावर घडले असे काही….!

340 0

पुणे : पुण्यामध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे . यामधील दोन आरोपींविरुद्ध 23 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार , प्रमुख आरोपी इमरान समीर शेख हा 38 वर्षीय इसम या 23 वर्षीय तरुणीच्या प्रेमात पडला . परंतु या तरुणीने इम्रान याच्याशी लग्न करण्यास साफ नकार दिला. त्यानंतर आरोपी इम्रान याने तरुणीची बदनामी करण्याच्या उद्देशाने तिच्यासोबत थेट निकाह झाला असल्याचे सिद्ध करण्यासाठी बनावट निकाहनामा आणि बनावट मॅरेज सर्टिफिकेट तयार करून घेतले. एवढेच नाही तर समाजामध्ये त्यांच्या खोट्या लग्नाची बातमी पसरवण्यासाठी त्याने हा निकाहनामा व्हायरल देखील केला .

या घटनेची माहिती तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये प्रमुख आरोपी इमरान शेख यांच्यासह शेख खलील शेख जलील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान शेख आणि ही तरुणी यांच्यामध्ये वयाचे मोठे अंतर होते . त्यामुळे तिला हे लग्न मान्य नव्हते ,परंतु तिच्यावर लग्नाचा दबाव टाकण्यासाठीच या व्यक्तीने असे पाऊल उचलले.

Share This News

Related Post

ग्राहकांना बसणार झटका ! १२ टक्क्यांपर्यंत प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढण्याची शक्यता

Posted by - May 24, 2022 0
मुंबई- रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलसारख्या खासगी दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका देण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या सुमारास…
Jalgaon News

Jalgaon News : धक्कादायक ! परीक्षेत कमी गुण पडल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

Posted by - May 18, 2024 0
जळगाव : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये अपयश आल्याने एका तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट…
Sameer Wankhede

माझ्यावरही अतिक अहमदसारखा हल्ला होऊ शकतो; वानखेडेंची पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

Posted by - May 22, 2023 0
मुंबई : एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे (Former Director of NCB Sameer Wankhede) यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.…

मुश्ताक अहमद जरगर दहशतवादी घोषित, कंधार विमान अपहरणाच्या बदल्यात त्याची झाली होती सुटका

Posted by - April 14, 2022 0
नवी दिल्ली- केंद्रीय गृह मंत्रालयाने अल-उमर मुजाहिद्दीनचा संस्थापक आणि मुख्य कमांडर मुश्ताक अहमद जरगर याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967…

शिक्षकच होता हैवान; आई वडील एकमेकांच्या भांडणात होते व्यस्त; असा आला गुन्हा उघडकीस, पण तोपर्यंत…

Posted by - March 4, 2023 0
पुणे : पुण्यामधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्थात ही घटना उघडकीस येईपर्यंत या पिडीतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *