Mumbai Jaipur Express

Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये पहाटे 2.50 ते 5.30 दरम्यान नेमके काय घडले?

646 0

मुंबई : मुंबई जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express Firing) आज सकाळी RPFच्या जवानाने गोळीबार केल्याची घटना घडली होती. यामध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जयपूर एक्सप्रेसच्या (Jaipur Express Firing) एकूण तीन डब्यांमध्ये हा गोळीबार झाला. B5, S6 आणि पँट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंहने गोळीबार केला. आरोपी चेतन हा मुंबई सेंट्रल आरपीएफमध्ये तैनात आहे. त्याचे पोलीस ठाणे लोअर परळ इथे आरपीएफ कार्यालय आहे. तर मृत एएसआय टिकाराम हे दादर आरपीएफमध्ये तैनात होते.

Jaipur Express Firing : जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलकडून गोळीबार, 4 जणांचा मृत्यू

पहाटे 2.50 ते 5.30 दरम्यान ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं ?
आरोपी चेतन हा उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रहिवाशी आहे. यापूर्वी त्याची पोस्टिंग गुजरातमध्ये होती. नुकतीच त्याची मुंबईत नियुक्ती झाली. आरपीएफच्या सूत्रांनी सांगितलं की, एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एस्कॉर्टिंगसाठी एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन ते चार पोलीस नेहमीच तैनात असतात. एक्स्प्रेस ट्रेनवर नजर ठेवणं याला ट्रेन एस्कॉर्टिंग म्हणतात. ते ट्रेनने प्रवास करतात. काल आरोपी चेतनने सूरत रेल्वे स्थानकापर्यंत एक ट्रेन एस्कॉर्ट केली. सूरत रेल्वे स्थानकावर त्याने काही तास विश्रांती घेतली. आज पहाटे 2.50 वाजता चेतन सूरत रेल्वे स्थानकावरुन जयपूर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चढला. चेतनसोबत आणखी दोन हवालदार आणि एएसआय टिकाराम हे सर्वांचे नेतृत्व करत होते. जयपूर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या एस्कॉर्टिंगसाठी तीन हवालदार आणि एक एएसआय होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर रेल्वे स्थानकावरुन ट्रेन जात असताना चेतनने गोळीबार (Jaipur Express Firing) सुरु केला. विरार स्थानकानंतर आरोपीने चेन पुलिंग केले. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण आधीच सतर्क झालेल्या रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी त्याला पकडले. गाडी नंतर बोरीवली रेल्वे स्थानकावर नेण्यात आली, जिथे मृतदेह काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. सर्व मृतदेह शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी कांदिवली येथे ठेवण्यात आले आहेत.

Share This News

Related Post

अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे, सीताराम कुंटे त्यांचा इडी समोर जबाब

Posted by - January 29, 2022 0
मुंबई- राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार…

वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा वाहन परवाना निलंबित करावा – उपमुख्यमंत्री

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषीत करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे निर्देश देतानाच…

संतापजनक : ‘या’ शुल्लक कारणामुळे नातवानेच आजी-आजोबांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून केली क्रूरतेने हत्या; अवघ्या तीन तासात पोलिसांनी असा लावला छडा

Posted by - December 5, 2022 0
नाशिक : नाशिकच्या अभोना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने आजी-आजोबा आणि नातवाच्या नात्याला काळीमा फासली आहे. नातवाने आपल्या आजी…

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरु

Posted by - May 4, 2022 0
मुंबई- मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न संदीप देशपांडे आणि संतोष धुरी…

अहमदनगर : धक्कादायक…! रुग्णालयाच्या गेटवरच महिलेची प्रसुती ; राज्यातील ग्रामीण भाग आजही आरोग्य सुविधेपासून दूर …

Posted by - August 3, 2022 0
अहमदनगर , (टाकळी काझी) : अहमदनगर जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेने राज्यातील ग्रामीण भागाला मिळणाऱ्या आरोग्य सुविधेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *