Nalsab Mulla

Nalsab Mulla Shot Dead : धक्कादायक ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

613 0

सांगली : राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये शनिवारी रात्री राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या (Murder) केली आहे. नालसाब मुल्ला (Nalsab Mulla) असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर एकूण 8 गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे सांगली शहर हादरलं आहे.

राष्ट्रवादीच्या फक्त त्याच लोकांना विधानसभेचे तिकीट मिळणार; अजित पवारांचे मोठे वक्तव्य

काय घडले नेमके?
नालसाब मुल्ला (Nalsab Mulla) हे राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र, मुल्ला (Nalsab Mulla) यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु, मागच्या काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या घराबाहेर बसले होते. यादरम्यान अज्ञात दोघा हल्लेखोरांनी मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नालसाब मुल्ला हे गंभीर जखमी झाले.

धुळे हादरलं ! राजकीय वादातून कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या

यानंतर त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुल्ला (Nalsab Mulla) यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत घटनेची माहिती मिळताच, सांगली पोलीस (Sangli Police) अधीक्षक बसवराज तेली (IPS Basavaraj Teli) यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सांगली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे; मुख्यमंत्र्यांची पत्राद्धारे प्रधान मंत्र्यांना विनंती

Posted by - October 18, 2022 0
मुंबई : साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून…

CRIME NEWS : अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरण! 32 आरोपींवर मोक्का

Posted by - November 22, 2022 0
कल्याण : अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरणातील सर्व 32 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यातील आरोपी पंढरीनाथ…

अफजलखानाच्या कबरीजवळील ‘त्या’ तीन कबरी कुणाच्या ?

Posted by - November 13, 2022 0
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी जवळ आणखी तीन कबरी आढळून आल्यानं खळबळ उडालीये. या तीन कबरी नेमक्या कुणाच्या आहेत,…
Manoj Jarange

Manoj Jarange : आंतरवालीत मनोज जरांगे यांनी केल्या ‘या’ 4 मोठ्या घोषणा

Posted by - January 28, 2024 0
जालना : मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. पण अजूनही लढाई संपलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj…

आज पासून बदलते आहे या चार राशींचे भाग्य; होणार महत्त्वपूर्ण आणि हितकारक बदल

Posted by - November 11, 2022 0
आज म्हणजेच शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रहाचे भ्रमण होते आहे. शुक्राचं संक्रमण झाल्यानंतर तो वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *