Sharad Pawar

शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी आयटी इंजिनिअरला अटक

396 0

पुणे : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करून धमकी देणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. सागर बर्वे (Sagar Barve) असे शरद पवारांना धमकी (Threat) देणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर (IT Engineer) आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता स्थानिक न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास करत विविध पथके तयार करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या आरोपीने ही धमकी का दिली आणि कोणाच्या सांगण्यावरून दिली याचा तपास पोलीस करत आहेत.

राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक खात्यावर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने एक खाते आहे. त्यावर असलेल्या पोस्टमध्ये पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.

Share This News

Related Post

Nanded Crime

सख्खा भाऊ पक्का वैरी ! ‘या’ शुल्लक कारणातून भावानेच केली भावाची हत्या

Posted by - June 4, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक अपघाताची घटना घडली होती. यामध्ये मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) गेलेल्या एका 62…
Shravan Giri Pass Away

Shravan Giri Pass Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध निवेदक प्राध्यापक श्रावण गिरी यांचं निधन

Posted by - September 4, 2023 0
बीड : ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक असलेले प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन (Shravan Giri Pass Away) झाले आहे. बीडमध्ये…
Viral Video

Viral Video : भरधाव कारने बाईकस्वराला बाइकसह 10 किमी पर्यंत फरफटत नेले

Posted by - August 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये एका भरधाव कारचा कहर पाहायला मिळाला आहे. या कारचा व्हिडिओ (Viral Video)…
Pune Crime News

Pune Police News : सदाशिव पेठमध्ये तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस हवालदारासह 3 जण निलंबित

Posted by - June 29, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत (Pune Police News) महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *