Navi Mumbai

स्थानिक गुंडाकडून दाम्पत्याला दगडाने मारहाण; म्हणाला वडापावची गाडी लावायची असेल तर…

721 0

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शहरामध्ये वडापावची गाडी चालवणाऱ्या नागेश लिंगायत आणि त्यांची पत्नी आरती या जोडप्याला हप्ता न दिल्यामुळे बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना नवी मुंबईतील महापे या ठिकाणी घडली आहे.

काय घडले नेमके?
महापे (Mahape) येथे राहणारे नागेश लिंगायत (Nagesh Lingayat) आणि त्यांची पत्नी आरती हे दोघे वडापावची गाडी लावून आपला उदरनिर्वाह चालवतात. याच परिसरात असणारे स्थानिक गुंड त्यांना धमकावत होते. “या ठिकाणी वडापावची गाडी लावायची असेल तर चार हजारचा हप्ता द्यावा लागेल”, असं त्यांना धमकावले. परंतु जोडप्याने त्याला हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना त्या स्थानिक गुंडाकडून बेदम मारहाण करण्यात आली.

या प्रकरणावरून नागेश लिंगायत आणि त्यांची पत्नी आरती लिंगायत यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी गुंडाविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या आरोपी गुंडाला अटक केली आहे. नागेश लिंगायत हे महापे येथील हनुमान नगर येथे राहत असून ते नोकरी करत होते. मात्र, नोकरी करून येणाऱ्या पैशांमध्ये घर खर्च भागत नव्हता, वाढत्या महागाईचा विचार करून पत्नी आरतीने आपल्या पतीला साथ देण्यासाठी महापे मिलेनियम बिजनेस पार्क बस स्थानकाच्या बाजूला वडापावची गाडी चालू केली होती.

Share This News

Related Post

भयानक : 31 डिसेंबरची रात्र त्या तरुणांसाठी ठरली काळरात्र ! दारुड्यांनी मागितलेले शंभर रुपये दिले नाहीत म्हणून तरुणाचा मनगटापासून तोडला हात, आणि मग …

Posted by - January 2, 2023 0
पुणे : पुण्यातील हि घटना ऐकून अक्षरशः अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अगदी एखाद्या चित्रपटांमध्ये साकारला जावा असा हा सीन…

चार्टर्ड प्लेन मधील फोटोंबद्दल विचारल्यावर नितीन देशमुखांची बोलती बंद

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेना आमदार नितीन देशमुखांनी आपण सुरत कशी सुटका करून घेतली, कसाबसा जीव वाचवून परत आलो, याची रंजक कहाणी बुधवारी…
crime news

Mumbai Crime: आधी हात व पाय बांधले आणि मग तोंडात रुमाल कोंबून…. केअर टेकरचे मालकासोबत धक्कादायक कृत्य

Posted by - May 8, 2023 0
मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 85 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची त्याच्याच घरी केअर…

अहमदनगरमधील घोडेगाव येथे राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

Posted by - April 30, 2022 0
अहमदनगर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादला सभेसाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. अहमदनगरमधील घोडेगावजवळ हा अपघात…
Crime

मित्र बनला वैरी; जेवणावरून झाला वाद आणि थेट….

Posted by - January 29, 2023 0
पुणे: जेवायला दिलं नाही म्हणून एकानं आपल्याच मित्राच्या कानाचा चावा घेऊन त्याचा कानच तोडल्याची धक्कादायक घटना मार्केटयार्ड परिसरात शुक्रवारी दुपारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *