नाशिक हादरलं ! दारूच्या नशेत जन्मदात्या पित्यानेच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

78 0

जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात कुणी नसल्याची संधी साधत आजारी मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीत शिकते. 25 एप्रिल 2024 रोजी या मुलीची प्रकृती ठीक नसल्याने ती शाळेत गेली नव्हती. तर घरातील इतर सदस्य देखील आपापल्या कामासाठी बाहेर गेले होते. मुलगी एकटीच घरातली झोपलेली होती. त्याचवेळी दारूच्या नशेत असलेला नराधम बाप घरात आला. घरात कुणी नसल्याची संधी साधत मुली जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. त्याने त्याचा व्हिडिओही मोबाईलवर बनवला. आणि हा व्हिडिओ आईला दाखवण्याची धमकी देत मुलीला कुठेही वाच्यता न करण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने ही बाब कोणालाही सांगितली नाही. त्याचाच गैरफायदा बापाने अनेकदा घेतला.

तीन महिन्यानंतर मुलीच्या आईने सहज पतीचा मोबाईल चेक केला असता तिला हा व्हिडिओ आढळून आला. त्यानंतर तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने याबाबत खुलासा केला. त्यानंतर आईने थेट म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व पोलिसांनी तात्काळ या नराधम बापाला ताब्यात घेतले आहे.

Share This News

Related Post

Car Accident

Car Accident : भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं अन् 4 सेकंदात खल्लास; अपघाताचा Live Video आला समोर

Posted by - May 23, 2024 0
बीड : बीडमधून अपघाताची एक भीषण घटना (Car Accident) समोर आली आहे. यामध्ये कार अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.…
Mulshi Accident

Mulshi Accident : मुळशीतील पिरंगुट घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा भीषण अपघात

Posted by - November 21, 2023 0
मुळशी : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. चालकाच्या चुकीमुळे हे अपघात होत असतात. मुळशीतील (Mulshi Accident) पिरंगुट घाटातदेखील…
Chhatrapati Sambhaji Nagar Accident

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू; संतप्त जमावाने बस पेटवली

Posted by - January 17, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी निघालेल्या…
Akola News

Akola Crime : संपत्तीच्या वादातून काका-काकूकडून पुतण्याची हत्या

Posted by - September 2, 2023 0
अकोला : संपत्तीच्या वादातून कुटुंबातील एकाची हत्या केल्याची घटना अकोल्यातील (Akola Crime) पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द याठिकाणी घडली आहे. मिलिंद…

स्वतःला बाळ होईना मंदिरातून पळवले अवघ्या सहा वर्षाच्या मुलाला; 90 CCTV व्हिडिओ धुंडाळून असे सापडले आरोपी

Posted by - March 7, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरातून एक अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेला स्वतःला अपत्यप्राप्ती होत नव्हती. या कारणाने तिने एका सहा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *