Nashik News

Nashik News : इन्स्टाग्रामवरची मैत्री तरुणीला पडली महागात तिच्यासोबत घडलेल्या घटनेने ती हादरली

494 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियाचा अतिरेक इतका झाला आहे की, कोण कधी कुणाला ब्लॅकमेल करेल हे सांगता हे येणं शक्य नाही. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या डॉक्टर तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉक्टर महिलेच्या तक्रारीवरून भाजपचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांचा मुलगा संशयित संदीप दोंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित फिर्यादी महिला व संशयित संदीप यांच्यामध्ये जानेवारी महिन्यात इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत अन् प्रेमात झाले. त्यानंतर संशयित हा पिडितेला भेटण्यासाठी तिच्या घरी ये-जा करू लागला. यावेळी ‘माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, आपण विवाह करू…’ असे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर पिडितेने त्यास आई-वडिलांना त्यांच्या नात्याची माहिती देण्यास सांगितले. दरम्यान, संशयित संदीप याने एकेदिवशी पिडितेच्या घरी येऊन तिच्याशी जवळीक साधून बळजबरीने शरिरसंबंध प्रस्थापित केले. यावेळी पिडितेने त्यास विरोध करत आक्षेप घेतला. यावेळी संशयिताने तिच्या विरोधाला न जुमानता शारीरिक संबंध ठेवले.

दरम्यान यातून पीडिता गर्भवती राहिली. याबाबत पीडितेने संशयितांस याबाबत सांगितले असता आपल्याला आताच हे नको असे बोलत पीडित तरुणीस गर्भपात करण्या सांगितले. त्यानुसार संशयिताने गर्भपाताच्या गोळ्या आणून देत त्या सेवन करण्यास सांगितले. यामुळे गर्भपात झाल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा असाच प्रकार घडल्याने पीडितेने याबाबत संशयितास जाब विचारला. यावर संशयिताने ‘तुझ्याशी माझा काही संबंध नाही, मी तुला लग्नाचे आश्वासन दिलेले नाही, असे सांगून तुझे परिसरात राहणे अवघड करू अशाप्रकारे दम भरला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित संदीपविरूद्ध अत्याचारासह गर्भपातास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरिक्षक मनीषा शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News

Related Post

पुणे महानगरपालिकेतील एक बडा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ; तिघे जण ताब्यात

Posted by - April 11, 2022 0
पुणे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने पुणे महानगरपालिकेच्यया कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे याच्यासह तिघांवर 15 हजार रूपयांची लाच…

सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त;

Posted by - May 22, 2022 0
केंद्र सरकारनं अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेल आता स्वस्त झाले आहे. पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी…

शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात

Posted by - July 11, 2022 0
मुंबई:  महाड पोलादपूरचे आमदार आणि शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात झाला आहे  मुंबईमधील ईस्टर्न फ्री-वेवर सात…

#VIRAL VIDEO : लव्ह ट्रायंगल मधून मुलींच्या टोळक्यानी तरुणीला बेदम तुडवले; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Posted by - February 27, 2023 0
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश मधील गोरखपुरमध्ये तरुणींची टोळक्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली आहे. नक्की या तरुणींच्या टोळक्यानी एका तरुणीला का…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *