Nashik Crime

Nashik Crime : खळबळजनक ! नाशिकमधील चांदवडच्या तरुणाची दिंडोरीतील पालखेड धरणाजवळ हत्या

640 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik Crime) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या लोखंडेवाडी, शिवारातील पालखेड धरणाच्या भरावाच्या किनारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मृतदेहाच्या तोंडावर व शरीराच्या अन्य भागावर धारदार आणि तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत.

काय घडले नेमके?
वणी पोलिस स्टेशन हद्दीतील लोखंडेवाडी शिवारात असलेल्या पालखेड धरणाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर व धरणाच्या भरावाच्या दगडांवर ता. 21 रोजी दुपारी 3 ते ता.22 रोजीचे दुपारी 2 वाजेच्या दरम्यान किशोर दगु उशीर (वय 26 वर्षे, राहणार खडकजांब ता. चांदवड) याच्यावर अज्ञात आरोपीने धारधार हत्याराने वार करण्यात आले. यामध्ये किशोरचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर आरोपीने मृतदेह लोखंडेवाडी शिवार पालखेड धरणाच्या भरावाच्या आत ओढत नेवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मृत किशोरचे नातेवाईक सुरेश सुधाकर कांडेकर (वय 39 रा. खडकजांब) यांच्या तक्रारीवरुन अज्ञात मारेकऱ्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने दिंडोरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे अधिक तपास करत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Deepfake Technology : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले डीपफेक तंत्रज्ञान नेमके काय आहे?

IRCTC ची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करताना येत आहेत अडचणी

KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला

Accident News : दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

Share This News

Related Post

Crime News

Crime News : PUBG खेळण्याच्या नादात आरोपीकडून आई-वडिलांची निर्घृणपणे हत्या

Posted by - September 6, 2023 0
मुंबई : PUBG या खेळाने अनेक लोकांना अक्षरशः वेड लावले (Crime News) आहे. या खेळामुळे कित्येक लोकांचे मानसिक संतुलन बिघडले…

पोलीस दलातील भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी केली अटक

Posted by - May 28, 2023 0
पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी बनावट सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन प्रमाणपत्र सादर करुन फसवणुक करण्याचा प्रयत्न केलेल्या उमेदवाराला पोलिसांनी…
Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj

Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा तयार! ‘या’ दिवशी होणार अनावरण

Posted by - January 28, 2024 0
रत्नागिरी: स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा (Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj) तयार झाला आहे. लवकरच…
Vasai Crime News

Vasai Crime News : खळबळजनक ! ‘त्या’ एका शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून 8 वर्षीय चिमुकलीची हत्या

Posted by - December 7, 2023 0
वसई : विरारमधून (Vasai Crime News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका 8 वर्षीय चिमुकलीची एका शाळकरी मुलाने…

#CYBER CRIME : रिफंडचा संदेश आला आहे ? प्राप्तीकराशी निगडीत कोणताही संदेश येत असेल तर सावध

Posted by - February 18, 2023 0
वाढत्या डिजिटल उपयोगामुळे फसवणूकीचे प्रकारही तितकेच वाढले आहेत. हॅकर आता प्राप्तीकर खात्याच्या नावावर रिफंडचा खोटा एसएमएस किंवा मेल पाठवून ग्राहकांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *