nashik Aacsident

Nashik Accident : हॉटेलच्या शोधात निघालेल्या दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

13123 0

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मित्रांना अपघातामध्ये जीव गमवावा लागला आहे. जेवणासाठी हॉटेलच्या शोधात निघालेल्या 3 मित्रांच्या दुचाकीची एसटी बसला धडक बसून भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

काय घडले नेमके ?
शुभम प्रशांत सोनवणे (21, रा. व्हीआयपी कॉलनी, भुसावळ) (Shubham Prashant Sonwane) व शुभम संतोष कोकाटे (Shubham Santosh Kokate) (21, रा. महाराणा प्रताप चौक, सिडको) अशी या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत तर जयेश अरुण महाजन (21, रा. म्हसवड, ता. जि. जळगाव) (Jayesh Arun Mahajan) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हे तिघेही नाशिक येथील संदीप फाऊंडेशन या महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. हे तिघेही एकाच दुचाकीवरून मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून भरधाव वेगात सिडकोतून त्र्यंबक रोडकडे येत होते.

यादरम्यान ते जिल्हा रुग्णालया जवळ आले असता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धावत्या बसच्या टूलबॉक्सवर पाठीमागून जाऊन आदळले. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच सरकार वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

Share This News

Related Post

Chatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : जिवलग मित्रांचं जेवण ठरलं अखेरचं ! रस्ते अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 24, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला आहे…
Police pune

पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे वरून वसुली; पोलीस दलात खळबळ

Posted by - June 8, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : आपले पोलिस दल कर्तव्यदक्ष असते म्हणून सर्वसामान्य सुरक्षित असतात. काही पोलीस अधिकारी, अंमलदार कर्तव्य बजाविण्यात कसलीही कुसर…

पुण्यातील शाळा तूर्तास बंदच मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय

Posted by - January 22, 2022 0
पुणे : पुणे शहरातील वाढते रुग्ण संख्या लक्षात घेऊन पुढील एक आठवडाभर राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय एकमतानं झाला असल्याची…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar :छ. संभाजीनगरात कार आणि ट्रकचा भीषण अपघात; 5 जण गंभीर जखमी

Posted by - July 24, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातून अजून एक अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात 5 जण गंभीर…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात

Posted by - April 6, 2022 0
मुंबई – सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी अनिल देशमुख यांची जेजे हॉस्पिटलमधून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *