Nashik Crime News

Nashik Crime News : नाशिक हादरलं ! मांत्रिक महिलेची भक्तानेच केली हत्या

15526 0

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मांत्रिक महिलेची तिच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या भक्तानेच चाकूने भोसकून हत्या केली आहे. ही घटना (Nashik Crime News) शुक्रवारी दुपारी शिंदे गावातील शिवरत्ननगर या ठिकाणी घडली आहे. जनाबाई भिवाजी बर्डे (वय 45) असे हत्या झालेल्या मांत्रिक महिलेचे नाव आहे तर निकेश दादाजी पवार (वय 41, रा. जेलरोड) असे हत्या करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे शिंदे गावामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
जनाबाई बर्डे ही महिला शिंदे गावात राहत्या घरात सुख-दु:खाचे बघणे, बाहेरचे बघणे, त्यावर मार्ग, तोडगा सांगत असे. आजूबाजूच्या परिसरातील रुग्ण तिच्याकडे उपायांसाठी येत होते. संशयित आरोपी निकेश दादाजी पवार हा देखील दोन वर्षांपासून त्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मृत जनाबाई बर्डे यांच्याकडे येत होता. मात्र, त्याला जनाबाईने सांगितलेल्या तोडग्याचा काहीही फायदा न झाल्याने त्याला राग आला होता.

Pan Aadhaar Link : पॅन-आधार कार्ड लिंक न केल्यास करदात्यांना भरावा लागणार आता ‘एवढा’ दंड

शुक्रवारी दुपारी जनाबाईकडे मार्ग सांगण्याचा वार होता. त्यामुळे निकेश नेहमीप्रमाणे शिंदे गावात जनाबाईच्या घरी गेला. त्यावेळी घरात असलेल्या जनाबाईवर त्याने सोबत आणलेल्या चाकूने मानेवर, पोटावर सपासप वार केले आणि घटनास्थवरून पळ काढला. यादरम्यान घटनास्थळी हत्या झालेल्या जनाबाई बर्डेची मावसबहीण रंजना माळी आली. तिला बहीण रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली आणि हाती चाकू असलेला संशयित निकेश पवार घराबाहेर पडताना दिसल्याने तिने मदतीसाठी आरडाओरडा करत निकेशचा पाठलाग केला. काही नागरिकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो गावातून बाहेर पडला.

Pune News : पिकनिक पडली महागात ! कुंडमळा धबधब्यावरील ओंकार गायकवाडचा अखेरचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

या घटनेची (Nashik Crime News) माहिती मिळताच पोलिस शिपाई विष्णू नाईक, मनोहर कोळी या पोलिसांनी शिंदे टोल नाका गाठून संशयित निकेश पवार याला ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे, वरिष्ठ निरीक्षक देवीदास वांजळे, सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Share This News

Related Post

काल महाआरती आज पत्रकार परिषद ; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष

Posted by - April 17, 2022 0
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.. काल पुण्यातील खालकर चौकातील हनुमान आरतीवरून आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून…

कसबा आणि चिंचवडमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात दोन्हीही मतदारसंघात मोठा पोलीस बंदोबस्त, आतापर्यंत काय झाले ?

Posted by - February 26, 2023 0
पुणे : आज अखेर कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनेक आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर अखेर आजचे…
Latur News

Latur News : जरा काम आहे जाऊन आलोच; पित्याने लेकरांना दिलेले ‘ते’ शब्द ठरले शेवटचे

Posted by - August 31, 2023 0
लातूर : सध्या राज्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लातूरमध्ये (Latur News) अपघाताची अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील…
Arrest

कोंढव्यात आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या नऊ जणांना अटक, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Posted by - April 10, 2023 0
इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या नऊ सट्टेबाजांना गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून कम्प्युटर, तीन…
Nanded Crime News

Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 3, 2024 0
नांदेड : नांदेडमधून (Nanded Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ट्रॅक्टर कालव्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *