Nasik

लग्नावरून परतताना कार नदीत कोसळून भीषण अपघात; चिमुकलीसह 3 जणांचा मृत्यू

2305 0

नाशिक : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अशीच एक अपघाताची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या नांदगाव-मालेगाव मार्गावर हा भीषण अपघात ( Accident) झाला आहे. नांदगाव -मालेगाव मार्गावर (Nandgaon – Malegaon road) नाग्या – साक्या धरणाच्या (Nagya – Sakya Dam0 पुलावरून कार कोसळून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका लहान बालिकेसह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 7 जण जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
हे सर्वजण मालेगाव येथील असून जालन्याला लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न सोहळा आटपून मालेगावकडे परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्दैवाने या अपघातात एका लहान बालिकेसह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर चार जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Narendra Dabholkar

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून तपासाप्रकरणी सुप्रीम कोर्टाची सीबीआयला नोटीस

Posted by - May 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या खूनाच्या प्रकरणातील तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या (CBI) निर्णयाच्या…

बावधनमध्ये सिमेंट पोत्यात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले

Posted by - April 20, 2022 0
पिंपरी- हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथील नाल्यात सिमेंट पोत्यात भरलेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या खुनाचे…
DRDO

Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकरसह अन्य एक अधिकारी पाकिस्तानच्या संपर्कात? ATS च्या तपासात समोर

Posted by - May 10, 2023 0
पुणे : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (ATS) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ…

BIG BREAKING : रविवार पेठ येथे तारा मॉल टेरेसवर असलेल्या प्लास्टिक टाक्यांना भीषण आग

Posted by - October 28, 2022 0
पुणे : रविवार पेठेतील तांबोळी मज्जिद येथे असलेल्या तारा मॉलच्या टेरेसवर प्लास्टिकच्या टाक्यांना भीषण आग लागली आहे. फायर ब्रिगेडच्या मुख्यालयामधून…

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

Posted by - August 10, 2022 0
कुलाबा – वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *