Nanded News

Nanded News : डॉक्टर होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं ! सुट्टीसाठी घरी आलेल्या ‘त्या’ तरुणाचा आढळला मृतदेह

802 0

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नायगाव तालुक्यातील टाकळगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे. योगेश गिरी असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो परभणी जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेत होता. योगेशची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? याची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

काय घडले नेमके?
मृत योगेश गिरी हा परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात बी. ए. एम. एसचे शिक्षण घेत होता. चार दिवसांपूर्वी तो आपल्या गावी टाकळगाव येथे आला होता. रविवारी तो कोणाला काहीही न सांगता अचानक घरातून निघून गेला. सुरुवातीला योगेश हा मित्राकडे गेला असावा असे त्याच्या कुटुंबियांना वाटले मात्र सायंकाळपर्यंत तो घरी परतलाच नाही. रात्री उशिरापर्यंत योगेश हा घरी परत न आल्याने कुटुंबियांची धाकधूक वाढली. मित्र तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, पण त्याचा काही शोध लागला नाही.

यानंतर मंगळवारी सकाळी परिसरातील नागरिकांना योगेशचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या घटनेमुळे गिरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा असा अंत झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

Sunil Kedar

Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल

Posted by - December 22, 2023 0
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणाचा निकाल लागला आहे. यामध्ये राज्याचे माजी मंत्री सुनील…
Pune News

Pune News : खळबळजनक ! पिझ्झा डिलिव्हर करण्यासाठी उशीर झाल्याने ग्राहकाची डिलिव्हरी बॉयला मारहाण

Posted by - October 25, 2023 0
पुणे : आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या राहणीमानात बदल होताना दिसत आहे. या धावपळीच्या जगात (Pune News) लोक वेळ वाचवण्यासाठी ऑनलाईन…
Kishori Pednekar

Kishori Pednekar : डेड बॉडी बॅग खरेदी घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांचा पासपोर्ट EOW कडून जप्त

Posted by - September 16, 2023 0
मुंबई : सध्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोविड काळातील कथित डेड बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *