Crime News

Crime News : महाराष्ट्र हादरला ! शिक्षकदिनादिवशीच शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

1117 0

नांदेड : आज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. मात्र आजच्या दिवशीच महाराष्ट्रात शिक्षकीपेक्षाला काळिमा फासणारी (Crime News) घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी आरोपी नराधम शिक्षकाला अटक केली आहे.

इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये उघड झाली आहे. किनवट येथील एका जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार आहे. या घटनेमुळं पालकांनादेखील मोठा धक्का बसला आहे. जितेंद्र धोंडे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील मूळ रहिवासी असलेला आरोपी शिक्षक जितेंद्र धोंडे हा किनवट मधील माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. आरोपी शिक्षकाने मुलीला आमिष दाखवून तब्बल तीन दिवस म्हणजेच 22, 23 व 24 ऑगस्ट रोजी आपल्या गोकुंदा येथील घरी नेले. त्यानंतर नराधम शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत घरी न सांगण्याबाबत धमकी दिली. या सगळ्या प्रकारामुळे पीडित तरुणी घाबरली होती. यानंतर या तरुणीने शाळेत जाण्यास नकार दिला.

यानंतर पीडित तरुणीच्या आईने तिला विश्वासात घेत तिची विचारपूस केली असता पीडित तरुणीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. मुलीसोबत घडलेला प्रसंग ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अल्पवयीन मुलीसोबत घडलेला धकादायक प्रकार उघड झाल्यानंतर तिच्या पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी किनवट पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षक जितेंद्र धोंडे याच्याविरुद्ध कलम 376 आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्षक दिनाच्या दिवशीच ही घटना उघडकीस आल्याने संपूर्ण महाराष्ट्र्र हादरला आहे.

Share This News

Related Post

Satara News

Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

Posted by - March 5, 2024 0
सातारा : पिंपोडे बुद्रुक (Satara News) येथील खूनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला 15 दिवसांनी यश आले आहे. या…

पुणे तिथे दंडही नाही उणे ! पुणेकरांनी बेशिस्त वाहन चालविण्यासाठी दिला १५ कोटी दंड

Posted by - April 7, 2023 0
पुणेकर दंड भरण्यामध्ये देखील स्वतःला मागे ठेवत नाहीत. वाहन चालवताना नियमाची पायमल्ली करत हजारो पुणेकरांनी दंडाच्या स्वरूपात प्रादेशिक परिवहन विभागाला…
Government

Jalna Lathi Charge : जालना लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - September 4, 2023 0
जालना : जालन्यातील लाठीमाराच्या (Jalna Lathi Charge) घटनेवरून राज्यात जोरदार पडसाद उमटलेले आहेत. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे मराठा समाजात…
Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar : माताच बनली वैरी ! 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ

Posted by - January 3, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एक आई आठ महिन्यांच्या बाळाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *