Nanded Crime News

Nanded Crime News : भावोजीकडून मेव्हणीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या; नांदेड हादरलं

929 0

नांदेड : नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून हत्या (Nanded Crime News) केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये प्रेमप्रकरणाच्या वादातून भावोजीने मेव्हणीच्या प्रियकराची हत्या (Nanded Crime News) केली आहे. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. किरण माने असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर शिवा माने असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. ही हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थवरून फरार झाला आहे. या हत्येप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. मेहुणीच्या प्रेमसंबंधातून भावोजीने ही हत्या केल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Kolhapur News : कोल्हापुरात हिजाबवरून पेटला वाद; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे जय श्री रामच्या घोषणा देत आंदोलन

काय घडले नेमके?
मृत किरण मानेचे शिवा मानेच्या मेहुणीशी प्रेमसंबंध सुरु होते. या प्रेम संबंधाला शिवाचा विरोध होता. शिवा वारंवार हे संबंध संपवण्यासाठी किरणला सांगत होता. या कारणातून अनेकदा किरण माने आणि शिवा माने यांच्यात वाददेखील झाला होता. मात्र किरण प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हता. यामुळे आरोपी शिवाने मित्रांच्या मदतीने किरणचा अडसर दूर करण्याचे ठरवले.

Suicide News : ‘ही’ दोस्ती तुटायची म्हणत 2 जिवलग मित्रांची ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या

किरण मानेचा जागीच मृत्यू
ठरलेल्या योजनेप्रमाणे मुख्य आरोपी शिवा माने, सुभाष माने आणि अन्य आरोपींनी काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास किरण मानेला गाठत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात (Nanded Crime News) किरण मानेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News

Related Post

Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेचे उपोषण स्थगित; 13 जुलैपर्यंत सरकारला दिला अल्टीमेटम

Posted by - June 13, 2024 0
जालना : मराठा आरक्षणासाठी सगेसाेयरीची अंमलबजावणी 30 जूनपूर्वी करा अशी आग्रही मागणी करत या प्रश्‍नी 13 जुलैपर्यंत राज्‍य सरकारने ठाेस…

CRIME NEWS : पुणे जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट ; गुन्हा दाखल – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

Posted by - August 25, 2022 0
पुणे जिल्ह्यात फिरत्या मोटारींतून बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात खटला…
Chhatrapati Sambhajinagar Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : तू मला भेट नाहीतर… रुमवर बोलवून तरुणीवर अत्याचार केले अन्… छत्रपती संभाजीनगर हादरलं !

Posted by - October 12, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.…

मालेगावात काँग्रेसच्या 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; अजित पवारांची नगरसेवकांना सूचना

Posted by - January 27, 2022 0
मुंबई- मालेगावातील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश…
Congress

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Posted by - April 22, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने पक्षाची साथ सोडत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *