Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये आणखी एका तरुणाने संपवले जीवन

483 0

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात पाहायला मिळाले. परंतु सरकारने दोन महिन्याचा अवधी मागून घेतल्याने आरक्षणाचा लढा काही अंशी थंडावला. मात्र तरुणांच्या मनात अजूनही राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे संतापाचे वातावरण आहे. यादरम्यान नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी विष पिऊन आत्महत्या केली आहे. दाजीबा रामदास कदम (वय 23) असं तरुणाचं नाव आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी एकट्या नांदेडमधून 4 जणांनी आत्महत्या केली आहे.

काय घडले नेमके?
नांदेड शहराच्या छत्रपती चौक परिसरात झेंडा चौक येथे दाजीबा कदम याने शनिवारी दुपारी विष घेतले होते. तिथेच तो बेशुद्ध अवस्थेत पडला. ही माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा रविवार 13 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. यामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दाजीबा कदम याचं बारावी पर्यंत शिक्षण झालं आहे. अनेक वेळा शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केले, पण आरक्षण विना मला नोकरी मिळत नाहीये. एक मराठा लाख मराठा असं चिठ्ठीत लिहीत त्याने आत्महत्या केली.रामदास कदम यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. दिड एकर शेतीवर ते उपजीविका भागवत असतात. त्यांचा मुलगा दाजीबा हा बारावी उत्तीर्ण असून तो शासकीय नोकरीच्या शोधात होता. मात्र आरक्षणा विना त्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. दरम्यान दिवाळी सनाचा उत्साह असताना मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

pune police

Pune Police Crime Branch News : गॅम्बलिंगच व्यसनापोटी घरफोडया करणार्‍याला अटक; 21 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Posted by - May 10, 2023 0
पुणे : पुणे पोलिस क्राईम ब्रँचने एक धडक कारवाई करत गॅम्बलिंगच व्यसनापोटी घरफोडया करणार्‍या एका तरुणाला अटक केली आहे. तसेच…

महाराष्ट्राचा सुपुत्र रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Posted by - February 21, 2022 0
सांगली- जिल्ह्यातील शिगाव वाळवा तालुक्यातील शिंगावचा सुपुत्र 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात त्याच्याच गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात…
NIA

ISIS च्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला कोंढव्यातून अटक

Posted by - July 27, 2023 0
पुणे : NIA कडून पुण्यात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ISIS च्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला पुण्याच्या कोंढवा परिसरातून…

नाशिकमध्ये पुन्हा अपघातानंतर बस पेटली; ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

Posted by - December 8, 2022 0
नाशिक : नाशिकमध्ये बसचा पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसने पेट घेतला. या अपघातामध्ये पाच जणांना आपला…

पुणे : आंबेगावातील जवानाला मध्यप्रदेशमध्ये वीरमरण; आज शासकीय इतमात अंत्यसंस्कार

Posted by - November 15, 2022 0
पुणे : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील जवान सुधीर थोरात (वय वर्ष 32) यांना मध्य प्रदेश येथील ग्वाल्हेर मध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *