Nagpur News

Nagpur News : देवदर्शन करुन घरी परतत असताना काळाचा घाला; 2 जणांचा मृत्यू

571 0

नागपूर : राज्यात अपघाताचे सत्र सध्या सुरूच आहे. नागपूरमध्ये (Nagpur News) देवदर्शन घेऊन घरी परतत असताना एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात (Nagpur News) दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 7 जण जखमी झाले आहेत. रामटेकगड येथून देवदर्शन आणि पर्यटन करून भंडाराऱ्याकडे जात असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये भरधाव कारने उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.

Satara News : जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने 15 मिनिटांच्या अंतराने बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू

जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की कारच्या एका बाजूला पूर्ण चुराडा झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील रहिवासी राजेश भेंडारकर आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी दर्शनासाठी आले होते. रामटेक गडमंदिर येथे दर्शन करून ते आपल्या गावी परतत असताना रामटेक-भंडारा मार्गावर आरोली खंडाळा गावाजवळ भरधाव कार उभ्या असलेल्या ट्रकला धडकली आणि हा अपघात झाला.

Weight loss : ‘हेल्दी अँड फिट’ बॉडी मिळवण्यासाठी ‘ही’ योगासने नक्की ट्राय करा

हा अपघात (Nagpur News) एवढा भीषण होता कि, समोरच्या सीटवर बसलेला चालक आणि महिला जखमी अवस्थेत कारमध्ये अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्व जखमींना उपचारासाठी रामटेकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी परसराम भेंडारकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर उर्वरित जखमींना नागपूर या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

#Solar Eclipse : 2023 वर्षातल्या पहिल्या सूर्यग्रहणाला ‘या’ ३ राशींनी सावध राहा; वाचा तारीख आणि ग्रहण कालावधी

Posted by - February 10, 2023 0
ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण खूप महत्वाचे मानले जाते. भौगोलिक घडामोडींचाही सर्व राशींवर प्रभाव पडतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. या वर्षातील पहिले…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : संविधानिक नसलेल्या उपमुख्यमंत्रीपदाचं महत्त्व नेमकं काय ? ‘या’ राज्यात आहेत सर्वाधिक उपमुख्यमंत्री!

Posted by - July 3, 2023 0
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. मागच्या वर्षी जून मध्ये एकनाथ शिंदे गट बंडखोरी करून शिवसेनेतून बाहेर पडला. या…

Nana Patole viral video case : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, “राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार”…

Posted by - July 22, 2022 0
Nana Patole viral video case :  काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर…

पुणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण ? जाणून घ्या सविस्तर माहिती

Posted by - May 31, 2022 0
पुणे- पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह 14 महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. ही सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *