Mumbai-Pune Express

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

480 0

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक निकामी झाल्यामुळे एका ट्रकनं समोर असलेल्या टेम्पो आणि कारला धडक दिली. या अपघातात कारमधील दोघांचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कसा घडला अपघात?
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यानं चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रकनं पुढे असलेल्या कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका ओमीनी कारला धडक दिली. ट्रकनं दिलेल्या धडकेनं भीषण अपघात झाला. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, ओमनी कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, ओमनीमधील 3 जण जखमी झाले आहेत. तर या अपघातात ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. तसेच, ट्रकमधील 2 जण जखमी झाले आहेत. ट्रकची धडक ज्या टेम्पोला बसली, त्यातील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. असे अपघातात एकूण 8 जण जखमी झाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Share This News

Related Post

Dharashiv News

Dharashiv News : अधिकारी बनण्याचे स्वप्न राहिले अधुरं; सरावादरम्यान तरुणाच्या डोक्यात गोळा पडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 30, 2024 0
धाराशिव : धाराशिवमधून (Dharashiv News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणाच्या…

ॲड. गुणरत्न सदावर्तेंना बार कौन्सिलचा दणका; वकिली सनद दोन वर्षांसाठी रद्द

Posted by - March 28, 2023 0
  बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवानं ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिली सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली बार कौन्सिलनं वकिलांना…

धक्कादायक : अभ्यास करताना मोबाईल पाहण्यासाठी रोखले म्हणून मुलाने केली आईची हत्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Posted by - February 17, 2023 0
पुणे : पुण्यातील लोणी काळभोर मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यास करताना सातत्याने मोबाईल पाहतो म्हणून…

Gram Panchayat General Elections : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश

Posted by - July 26, 2022 0
पुणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीबाबत १९ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता अमलांत आली असून निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार…

साधू वासवानी यांच्या 143 व्या वाढदिवसानिमित्त 56 व्या वार्षिक रथयात्रेचे आयोजन

Posted by - November 23, 2022 0
पुणे : २३ नोव्हेंबर २०२२ रोजी साधू वासवानी मिशनने साधू वासवानी यांचा १४३ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि करुणा आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *