Mumbai Suicide

Sea Link Suicide : सी लिंकवरून समुद्रात उडी मारणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला

1445 0

मुंबई : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवरून (Sea Link Suicide) 31 जुलै रोजी एका व्यक्तीने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या व्यक्तीचे सर्च ऑपरेशन (Sea Link Suicide) सुरु होते. मुंबई पोलीस, नौदल आणि कोस्ट गार्ड एकत्रितपणे त्या व्यक्तीचा शोध घेत होते. अखेर त्या व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी दादर चौपाटी जवळ आढळून आला आहे. टिकम माखिजा असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते. ते पेशाने व्यापारी होते.

काय घडले होते?
31 जुलै रोजी सकाळी वांद्रे वरळी सी लिंकच्या बरोबर मध्यभागी टिकम माखिजा यांनी आपली कार थांबवली आणि समुद्रात उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलानं हेलिकॉप्टरच्या मदतीनं शोधमोहीम सुरू केली होती. सी लिंकवर उभ्या असलेल्या कारमधील कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना माखिजा यांची ओळख पटली.

टिकम माखिजा हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील खार परिसरात व्यवसाय करायचे. या प्रकरणी ADR अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माखिजा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही याचा तपास पोलीस करत आहेत.

Share This News

Related Post

मोठी बातमी ! गुणरत्न सदावर्ते यांच्या सुनावणीला सुरूवात

Posted by - April 9, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी (दि.8 एप्रिल) राहत्या घरातून…

#PUNE : खासदार गिरीश बापट यांच्या धार्मिक विकास निधी मधून श्री कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण

Posted by - March 22, 2023 0
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या धार्मिक विकास निधी मधून श्री कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण राष्ट्रीय…

Lok Sabha Elections : ठाकरे गटाचे स्टार प्रचारकरांची यादी जाहीर; 40 जणांचा समावेश

Posted by - March 30, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेनेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली असून…

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 5 महिलांचा जागीच मृत्यू

Posted by - February 14, 2023 0
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण  अपघात झाला असून यामध्ये 5 महिलांचा जागीच मृत्यू, झाला आहे. तर 13 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *