Gas Cylinder Blast

Gas Cylinder Blast : मुंब्य्रातील चांदनगर परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट

361 0

ठाणे : ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्रातील चांदनगर परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट (Gas Cylinder Blast) झाला आहे. मुघल पार्क या इमारतीच्या ए विंगमध्ये एका भंगाराच्या दुकानामध्ये गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने हा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या तीन घरांचे देखील नुकसान झाले आहे.

शनिवारी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मुंब्रा येथील चांदनगर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. गॅस लिकेज झाल्याने भडका उडाल्यामुळे तीन व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना एका खाजगी रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामध्ये एक रिक्षा आणि एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, पीकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान, फायर वाहनासह तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी तातडीने दाखल झाले. स्थानिक पोलीस या दुर्घटनेचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

Gulabrao Patil

Women’s Reservation : महिला आरक्षण लागलं तर तुमच्याकडे ‘मामी’ आहेत; आमचं काय? गुलाबरावांनी मांडली व्यथा

Posted by - September 30, 2023 0
जळगाव : महिला आरक्षणाच्या (Women’s Reservation) निर्णयामुळे आता जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण या मतदारसंघापैकी एका मतदारसंघात महिलांसाठी राखीव जागा…
Debu Khan

Debu Khan : लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान मृत्यू प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल

Posted by - October 19, 2023 0
पुणे : प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी (Debu Khan) एक मोठी अपडेट समोर आली आहे. आर्थिक व्यवहारातून प्रसिद्ध…

पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ऍक्शन मोडवर ; चुहा गँगच्या प्रमुखवर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - September 12, 2022 0
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील रेकॉर्डवरील आरोपी इस्माईल मौलाली मकानदार आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई…

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल

Posted by - April 11, 2022 0
पिंपरी- डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात घडली. लाईफ लाईन…
Shinde Fadanvis Decision

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - June 13, 2023 0
मुंबई : आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार मागील वर्षी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *