Satara Accsident

सातारा-मेढा रोडवर कारच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

839 0

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये मेहुल सुरेश मर्ढेकर (वय 26, रा. ओझरे) (Mehul Suresh Mardekar) याला अपघातात (Accident) जीव गमवावा लागला आहे. मेहुल हा सातारा-मेढा रस्त्यावर रात्री दहाच्या सुमारास जेवण करून शतपावली करत असताना हा अपघात झाला. सातारहून आलेल्या भरधाव कारने त्याला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि, मेहुलचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात (Medha Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. मेहुल हा मुंबईत एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. सध्या घरात त्याच्या लग्नाची बोलणी सुरु असल्यामुळे तो पाच दिवसांची सुट्टी घेऊन गावी आला होता.

काय घडले नेमके?
ओझरे येथील 26 वर्षीय युवक मेहुल सुरेश मर्ढेकर हा रात्री जेवण करून दहाच्या सुमारास सातारा-मेढा रस्त्यावर शतपावली करत होता. तो रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होता. गवळीच्या ओढ्याजवळ सातारा बाजूकडून स्विफ्ट डिझायर (MH 11 BV 9373) या भरधाव कारने मेहुलला जोराची धडक दिली.ही धडक एवढी भीषण होती कि, मेहुलचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सातारा सिव्हिल रुग्णालयात पाठवले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या ठिकाणी तपासून त्याला मृत घोषित केले. मेढा पोलिसांनी या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मेहुलच्या अपघाती निधनामुळे मर्ढेकर कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Related Post

कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये भाजप-शिंदे गटाने उधळला गुलाल; राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खाते देखील उघडले नाही

Posted by - December 20, 2022 0
कल्याण : कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला आहे. या निकालाकडे सर्वांचे होतं कारण, आतापर्यंत या दोन्ही…

‘श्रीं’च्या निरोपासाठी पुण्यनगरी सज्ज ! 8 हजार पोलिसांच्या फौजफाट्यासह 1200 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात

Posted by - September 8, 2022 0
पुणे : उद्या शुक्रवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज झाली असून गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार…

धक्कादायक ! पत्नी आणि पुतण्याचा खून करून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

Posted by - July 24, 2023 0
पुण्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पुण्यात पत्नीचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *