Mumbai Crime News

Mumbai Crime News : खाकीला काळिमा ! ATS अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

472 0

मुंबई : ज्याच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, नागरिकांची सुरक्षा करणे, त्यांच्यासाठी सुरक्षीत वातावरण तयार करण्याची जबाबदारी आहे, अशा पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार (Mumbai Crime News) केल्याचा आरोप आहे.आझाद मैदान पोलिस ठाण्यात एका सहाय्यक पोलीस निरीक्षकावर महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जानेवारी 2020 पासून हा सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्यावर बलात्कार करत असल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. ऑक्टोबर 2020 साली सहाय्यक पोलीस निरीक्षकाने शिवाजी पार्क परिसरात बलात्कार केल्याचे तक्रारीत पीडितेने म्हटले आहे.

राज्य दहशतवादविरोधी विभागातील (एटीएस) एपीआय विश्वास पाटील यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तपासादरम्यान मदत करणाऱ्या महिलेशी ओळख वाढवून पाटीलने तिला थंड पेयातून गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचे पिडीतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढे याचे रेकॉर्डिंग करून व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी ब्लॅकमेल करून अत्याचार सुरू होते. अखेर, पाटीलचे अत्याचार वाढल्याने महिलेने पोलिसांत धाव घेऊन आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली.

2019 साली विश्वास पाटील एटीएसमध्ये काम करत असताना गुंड रवी पुजारी प्रकरणात काम करत असताना पीडित महिलेची आणि पाटीलची भेट झाली. त्यानंतर पाटील यांनी महिलेशी मैत्री वाढवली. त्याने तिला पोलिस खात्याकडून आणखी व्यवसाय देण्याचे आश्वासन दिले. मैत्री वाढत गेल्यानंतर महिलेसमोर त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले. तेव्हा पिडीत महिलेने नकार दिला. त्यावेळी पाटील काम करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलच्या निरीक्षकाकडे तिने याबाबत तक्रार केली.

ऑक्टोबर 2020 साली पाटीलने पीडित महिलेला एका कामासाठी फोन केला आणि तिला शिवाजी पार्क परिसरात भेटण्यास सांगितले. दादर येथील हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. मात्र, रेस्टॉरंटमध्ये गर्दी वाढत असल्याने त्यांना बोलता येत नव्हते. त्यावेळी त्याने तिला शिवाजी पार्क येथील जवळच्या फ्लॅटमध्ये येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिला थंड पेयातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचे पिडीतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या कुटुंबाला मारण्याची धमकी देत तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली. या धमकीचा गैरफायदा घेऊन आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटीलने पीडित महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेने केला.

Share This News

Related Post

Satara News

Satara News : गो-कार्ट रेसिंगवेळी ओढणी अडकून मुंबईच्या महिलेचा महाबळेश्वरमध्ये दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 26, 2023 0
सातारा : महाबळेश्वरमध्ये (Satara News) वेण्णालेक परिसरात गो-कार्ट रेसिंग करणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग करताना…

#PUNE : दारू पिऊन शिवीगाळ केली म्हणून शेजारच्या महिलांनी केली मारहाण; अपमान सहन न झाल्याने रिक्षाचालकाने संपवली जीवन यात्रा

Posted by - March 27, 2023 0
पुणे : विश्रांतवाडीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धानोरे परिसरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकांन खाणीमध्ये उडी मारून आत्महत्या केली…
Pune News

Pune News : पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून पीएमपी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Posted by - March 10, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये ड्युटी न मिळाल्यामुळे एका बदली हंगामी रोजंदारीवरील पीएमपी…

सिंहगड रोड परिसरात पुन्हा एकदा थरार ; टोळक्याकडून एकाचा खून

Posted by - October 1, 2022 0
पुणे : सिंहगड रोड परिसरातील न-हे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली.…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

Posted by - March 20, 2022 0
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखले असून सचिन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *