MS Dhoni

MS Dhoni : धोनीला त्याच्या जवळच्याचं मित्रांनी लावला 15 कोटींचा चूना

776 0

मुंबई : भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एम एस धोनी (MS Dhoni) याने त्याच्या माजी व्यवसायिक भागीदारांविरोधात रांची कोर्टात क्रिमिनल केस दाखल केली आहे. एकेकाळी धोनीचे जवळचे मित्र असलेल्या अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे ​​मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांनी धोनीची 15 कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

कोण आहे मिहीर दिवाकर?
मिहीर दिवाकर हा धोनीचा जवळचा मित्र असून त्याने सोशल मीडियावर धोनीसोबत अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तसेच दिवाकर हा धोनीचा बिझनेस पार्टनर देखील राहिला आहे. दिवाकरने 2017 मध्ये धोनीसोबत जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी करार केला होता. परंतु तो त्या अटींचे पालन करू शकला नाही.अकादमी स्थापन करण्याच्या करारामध्ये अर्का स्पोर्ट्सला फ्रँचायझी फी भरणे आणि नफा शेअर करणे बंधनकारक होते, परंतु तसे झाले नाही.अनेकदा धोनीने प्रयत्न करून देखील करारात दिलेल्या अटी शर्तींकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे धोनीने 15 ऑगस्ट 2021 रोजी अर्का स्पोर्ट्सला दिलेले अथॉरिटी लेटर परत घेतले.

महेंद्र सिंह धोनीने 2021 मध्ये अर्का स्पोर्ट्सला दिलेले अथॉरिटी लेटर रद्द केल्यावर त्यांना यासंबंधित अनेक कायदेशीर नोटीसा पाठवल्या. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. यानंतर धोनीचे वकील दयानंद सिंह यांनी दावा केला आहे की अर्का स्पोर्ट्सने धोनीची फसवणूक केली असून, त्यांच्या क्लाएंटचे जवळपास 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana News : कोयता अन् देशी कट्टा घेऊन संतप्त शेतकऱ्याची बाजार समितीत घोषणाबाजी

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू

IND W Vs AUS W : आज भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना रंगणार

Nagpur News : महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणं आणि ढकलणं हा विनयभंग होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना उडवले

Ajit Pawar : कोणी कोणाला निवडून आणलं हे जिंकणाऱ्यालासुद्धा माहिती; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Share This News

Related Post

Kolhapur Accident

Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 18, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापुरमधून एक भीषण अपघाताची (Kolhapur Accident) घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बंगळुरु महामार्गावरील वाठार गावाजवळ भीषण…

#PUNE : दारू पिऊन शिवीगाळ केली म्हणून शेजारच्या महिलांनी केली मारहाण; अपमान सहन न झाल्याने रिक्षाचालकाने संपवली जीवन यात्रा

Posted by - March 27, 2023 0
पुणे : विश्रांतवाडीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धानोरे परिसरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकांन खाणीमध्ये उडी मारून आत्महत्या केली…

मोठी कारवाई : 6 ऑनलाइन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचे छापे ; 55 जणांवर कारवाई

Posted by - July 19, 2022 0
पुणे : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या ऑनलाइन मटक्याच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे पोलिसांनी एकाच…
Telgi Scam

Telgi Scam : छगन भुजबळांनी उल्लेख केलेला अब्दुल करीम तेलगी कोण आहे? आणि काय होता स्टॅम्प पेपर घोटाळा?

Posted by - August 28, 2023 0
मुंबई : रविवारी बीडमध्ये अजित पवार गटाची सभा पार पडली. या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर…
Pune News

Pune News : पैसे परत न केल्याने सावकाराकडून पतीसमोरच पत्नीवर लैंगिक अत्याचार

Posted by - July 26, 2023 0
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune News) गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच पुण्यातच (Pune News) एक धक्कादायक प्रकार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *