Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : राहुलच्या अटकेनंतर दर्शनाच्या आईने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

899 0

अहमदनगर : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या दर्शना पवार हत्या प्रकरणी (Darshana Pawar Murder Case) पुणे ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी राहुल हंडोरेला अटक केली आहे. दर्शना पवार बेपत्ता झाल्याच्या आधी शेवटची ती राहुल हंडोरेसोबत दिसली होती. हे दोघेजण राजगडावर गेले होते. त्यानंतर राजगडावरून फक्त राहुल हंडोरे एकटाच माघारी आला होता. राजगडाच्या पायथ्यशी असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये तो कैद झाला होता. राहुलला अटक झाल्यानंतर दर्शनाच्या कुटुंबीयांनी संताप (Darshana Pawar Murder Case) व्यक्त केला असून तिच्या भावाने आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्यथा मारून टाका अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Kolhapur Suicide News : स्वतःची चिता रचून मरणाला कवटाळले; वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळले

प्रेमप्रकरणातून केली हत्या
राहुलने प्रेमप्रकरणातून तिची हत्या केली असल्याचं प्रथमदर्शनी समोर आले आहे. राहुल आणि दर्शनाचे प्रेमप्रकरण होते आणि तिच्या परीक्षेआधी दोघांचे ब्रेकअप झाले होते. तर दर्शनाने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर राहुलने पुन्हा तिला लग्नासाठी विचारले. याला नकार दिल्यामुळे राहुलने तिला राजगडावर नेऊन तिची हत्या केली. यानंतर राहुल वेगवेगळ्या राज्यात गेला होता. शेवटी त्याला मुंबईतून अटक करण्यात आली.

Poster Viral : औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे; ‘त्या’ पोस्टरवरून वातावरण पेटण्याची शक्यता?

दर्शनाच्या आईने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
दर्शनाच्या आईने मुलीच्या हत्या प्रकरणी (Darshana Pawar Murder Case) राहुलला अटक झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि तो मीच देवू शकते. माझी मुलगी गेलीय, तशा इतरांच्या मुली जावू नये. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर फाशी द्या” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This News

Related Post

अंत्योदय योजना : लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन

Posted by - October 3, 2022 0
पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न…

तेलंगणात हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट्सचा मृत्यू, नलगोंडा जिल्ह्यात भीषण दुर्घटना

Posted by - February 26, 2022 0
नलगोंडा- तेलंगणात प्रशिक्षणार्थी हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट्सचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. ही घटना तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात कृष्णा…

उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

Posted by - October 22, 2022 0
मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून…
Ivan Menezes

Ivan Menezes: जगातील सर्वात मोठ्या मद्य कंपनीचे CEO इवान मेनेजेस यांचे निधन

Posted by - June 7, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी आणि महागडी मद्य कंपनी डियाजिओचे (Diageo) भारतीय वंशाचे सीईओ इवान मैनुअल मेनेजेस…
Eknath And Devendra

Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?

Posted by - April 24, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha) रणसंग्रामाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला टप्पादेखील पार पडला. मात्र या दरम्यान 1 जागा अशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *