Money Rain Pune

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

454 0

पुणे : आजही काही ठिकाणी लोक अंधश्रद्ध (Money Rain Pune) पाळताना दिसतात. अशीच एक घटना पुण्यातील हडपसर येथील ससाणेनगर या ठिकाणी घडली आहे. यामध्ये आरोपींनी एका व्यावसायिकाला जादूटोण्याच्या  बहाणा करून 18 लाख रुपयांचा चुना लावला आहे. 18 लाख रुपये दिल्यास 5 कोटी रुपये मिळतील असे आरोपींकडून सांगण्यात आले आणि याच आमिषाला व्यावसायिक बळी पडला आणि स्वतःची फसवणूक करून घेतली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
विनोद छोटेलाल परदेशी ( वय 43) व्यायसाय प्लास्टिक मोल्डिंग व कन्स्ट्रक्शन, रा. रामनगर हडपसर असे फसवणूक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. काल दि. 3 डिसेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास विशाल बिनावत यांचे घरी युनिवर्सल शाळेशेजारी ससाणेनगर हडपसर येथे मांत्रिकाकडून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा ठेवण्यात आली होती. फिर्यादी विनोद परदेशी यांच्यासाठी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधिवत पूजा संपन्न झाल्यास पैशांचा पाऊस पडणार असल्याचे फिर्यादी यांना भासविण्यात आले होते. पूजा करण्यासाठी 18 लाख रुपयाने भरलेली बॅग मागविण्यात आली होती.पूजा सुरु असतानाच आरोपी पैशाची भरलेली बॅग घेऊन फरार झाले.

पूजेत मग्न असणाऱ्या परदेशी यांना थोड्या वेळात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाणे वपोनि रवींद्र शेळके, उपनि अविनाश शिंदे या घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी आरोपींवर गुरन 1829/2023 भादंवि कलम 420, 406, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि विजयकुमार शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे
1. मांत्रिक बाबा आयरा शाब, रा. बदलापूर ठाणे,
2. माधुरी मोरे
3. रॉकी वैद्य
4. किशोर पांडागळे रा. एनडीए रोड उत्तमनगर

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Share This News

Related Post

Tukaram Maharaj Palkhi

Tukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण इंदापूरमध्ये पार पडले

Posted by - June 20, 2023 0
इंदापूर : जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी (Tukaram Maharaj Palkhi) सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे…

पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात नसून हत्याच ! आरोपीची कबुली, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - February 15, 2023 0
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रात वादाची नवीन ठिणगी पडली आहे. दरम्यान संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाल्यामुळे…
Pune News

Pune News : पुण्यात आज ओला-उबर, स्विगी-झोमॅटो ‘या’ ऑनलाईन सेवा राहणार बंद

Posted by - October 25, 2023 0
पुणे : पुणेकरांसाठी (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर,…

अधिसभा निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज; निर्भिडपणे आणि जबाबदारीपूर्वक प्रक्रिया पार पाडण्याचे कुलगुरूंचे आवाहन

Posted by - November 16, 2022 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार असून यासाठीची विद्यापीठाची तयारी अंतिम टप्प्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *