Nashik News

Nashik News : आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ तरुणाचा अखेर मृतदेह सापडला

3075 0

नाशिक : मित्रांसोबत आठवडाभरापूर्वी पार्टीला गेलेल्या युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरात (Nashik News) उघडकीस आला आहे. हा युवक आठवडाभरापासून बेपत्ता होता. शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास जनावरांना चारण्यासाठी गोदाकाठी घेऊन जाणाऱ्या गुराख्याला पंचक शिवारा जवळ उग्र वास आला. त्याने तात्काळ सतर्कता दाखवत गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांना ही माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनसाठी पाठवला त्यानंतर निर्घृण खून झाल्याचं समोर आले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आठ दिवसांपूर्वी जेल रोड येथील पंचक येथे राहणारा ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (वय 30) हा विवाहित युवक मित्रांसोबत पार्टीसाठी गेला होता. पण, तो पुन्हा घरी परतलाच नाही म्हणून पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार नाशिक रोड पोलिस ठाण्यात केली होती. पोलिस युवकाचा तपास करत असतानाच काल गोदाकाठी आगार टाकळी परिसरात मलनिस्सारण केंद्राजवळ छिन्न-विच्छिन्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा पंचनामा केला असता छातीवर खोल जखमा आढळून आल्या, तसेच त्याच्या चेहऱ्यावर सिमेंट सदृश्य पावडर देखील टाकण्यात आल्याचे समजत आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचे समजत आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी खून झालेल्या युवकाच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला संशयावरून ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी इतर दोन-तीन व्यक्तींना सुद्धा चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक रोड पोलिस करत आहेत. मृत ज्ञानेश्वर मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

Share This News

Related Post

Crime

नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कहर; चोरट्यांनी पळवलं केंद्रीय मंत्र्याच्या आईचं मंगळसूत्र

Posted by - August 20, 2023 0
नाशिक: नाशिकच्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील…

भाजप आमदार गणेश नाईक यांचा पोलिसांकडून शोध, अटकेची टांगती तलवार

Posted by - April 20, 2022 0
नवी मुंबई- भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यावरून नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- राज्यभरात आज गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जात आहे. आज एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत अनेकजण हा सण साजरा करत आहेत.…

Latur Crime News : लातूरमध्ये सिटी बसच्या चालक-वाहकाला किरकोळ वादातून बेदम मारहाण

Posted by - February 7, 2024 0
लातूर : लातूरमधून (Latur Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये लातूर शहरातील सिटी बस चालक आणि वाहकाला…

मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तावरे निलंबित

Posted by - April 15, 2022 0
पुणे- येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय तावरे यांच्यावर निलंबनाची कारवाई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *