Mira Road Murder Case

मीरारोड हत्या प्रकरणात आरोपीने केला ‘हा’ मोठा खुलासा; म्हणाला ती माझ्या मुलीसारखी…

19391 0

मुंबई : मिरारोडच्या गीतानगरमध्ये एका व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस येताच मोठी खळबळ माजली होती. या हत्येने संपूर्ण शहर हादरलं होतं. मीरा रोड हत्या प्रकरणी आता आरोपीने जबाब दिला असून त्यामध्ये त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपी मनोज साने याने लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले. ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि फेकून देऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

आरोपीने केला मोठा खुलासा?
“सरस्वती वैद्य माझ्या मुलीसारखी होती. तिने 3 जून रोजी आत्महत्या केली होती. माझ्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःचे आयुष्यही संपवण्याचा माझा प्लॅन होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

कशाप्रकारे केला खून?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सानेकडून करण्यात आलेल्या दाव्यांची पडताळणी केली जात आहे. इलेक्ट्रिक ट्री कटरने मृतदेहाचे लहान लहान तुकडे केल्यानंतर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यात आले होते. ते तुकडे सहज फेकता यावेत यासाठी त्याने हे कृत्य केले. मृतदेहाचे हे तुकडे त्याने बादली, टब, कुकर आणि इतर भांड्यांमध्ये ठेवले होते. तसंच हे तुकडे इतके बारीक केले होते की पोलिसांनाही ते मोजता आलेले नाही.

गुन्हा दाखल करण्यात आला
पोलिसांनी कलम 302 अंतर्गत हत्येचा आणि 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ठाण्यातील न्यायालयात हजर करण्यात आलं असून 16 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत साने याने पोलिसांना सांगितलं की, 2008 मध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं होतं. तेव्हापासून औषधे सुरू आहेत. तसेच मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे आणि सरस्वतीशी कधी शारीरिक संबंध ठेवले नाही असेदेखील त्याने पोलीस चौकशीत म्हंटले आहे.

Share This News

Related Post

जिल्हाधिकाऱ्यांकडून चांदणी चौक परिसरातील कामांची पाहणी अंतिम टप्प्यातील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश

Posted by - March 15, 2023 0
पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची…
Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad : खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये आढळला बेवारस मृतदेह

Posted by - September 13, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील दिघी परीसरात अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. एका अनोळखी व्यक्तीचा पठारे मळा…
Navi Mumbai

स्थानिक गुंडाकडून दाम्पत्याला दगडाने मारहाण; म्हणाला वडापावची गाडी लावायची असेल तर…

Posted by - June 15, 2023 0
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शहरामध्ये वडापावची गाडी चालवणाऱ्या नागेश लिंगायत आणि…
Mahashivratri

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक बसून 14 मुले जखमी

Posted by - March 8, 2024 0
कोटा : आज महाशिवरात्री (Mahashivratri) असल्याने संपूर्ण देशात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्त देशात वेगवेगळ्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त महापूजा…

…. म्हणून मुख्यमंत्री शिवजयंतीला शिवनेरीवर येणार नाहीत

Posted by - February 12, 2022 0
मुंबई- महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा मात्र शिवजयंतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *