Crime News

Crime News : PUBG खेळण्याच्या नादात आरोपीकडून आई-वडिलांची निर्घृणपणे हत्या

840 0

मुंबई : PUBG या खेळाने अनेक लोकांना अक्षरशः वेड लावले (Crime News) आहे. या खेळामुळे कित्येक लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. याच खेळाच्या बाबतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये PUBG च्या नादात एका तरुणाने आपल्याच आई – वडीलांची हत्या केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
ही घटना उत्तर प्रदेशातील झाशी येथील आहे. येथे एका व्यक्तीने आई-वडिलांना बेदम मारहाण केली आहे. हा तरुण PUBG खूप खेळत असे त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले. ज्यामुळे त्याने हा सगळा प्रकार केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. दूधवाला जेव्हा आरोपीच्या घरी पोहोचला तेव्हा हे हत्या प्रकरण उघडकीस आले. दूधवाल्याने घरात डोकावून पाहिले असता घरमालक आणि त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसल्याने त्याला धक्काच बसला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

अंकित असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने आपल्या हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. लक्ष्मी प्रसाद (व्यवसायाने सरकारी शिक्षिका) आणि विमला अशी मृतांची नावे आहेत. पोलिस जेव्हा घरी पोहोचले तेव्हा लक्ष्मी प्रसाद आणि विमला दोघेही गंभीर जखमी झाले होते, मात्र लक्ष्मी प्रसाद यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आणि उपचारादरम्यान विमला यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Share This News

Related Post

पुण्यातील कोंढवा परिसरात तरुणावर सपासप वार; काय आहे प्रकरण

Posted by - June 5, 2022 0
पुण्यातील कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथे शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. मित्राने एकाची गर्लफ्रेंड पटवल्याने त्याचा राग मनात धरुन तरुणावर तिघांनी…
Pune News

Pune News : धक्कादायक ! खराडीत खासगी स्विमिंग पुलात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

Posted by - April 16, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) खराडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खासगी स्विमिंग पुलात बुडून 13 वर्षीय…
crime

Chatrapati Sambhaji Nagar : मोबाईलच्या दुकानातून ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त; छ. संभाजीनगर मध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी मोठी कारवाई

Posted by - May 12, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या पैसा आणि अवैध मद्याचा सुळसुळाट सुरु आहे. त्यात ईडी आणि सीबीआयच्या धाडीत मोठ्या…

Mumbai CP Vivek Phansalkar : मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; दिवाळीच्या दिवशी अडीच महिन्याच्या बाळाचे अपहरण; असं शोधलं बाळाला…

Posted by - October 27, 2022 0
मुंबई : ऐन दिवाळीच्या दिवशी मध्यरात्री फुटपाथवर झोपणाऱ्या आई-वडिलांसोबत असलेल्या एका अडीच महिन्याच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. घाबरलेल्या आई-बापाने आझाद…
NIA

ISIS च्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला कोंढव्यातून अटक

Posted by - July 27, 2023 0
पुणे : NIA कडून पुण्यात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ISIS च्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला पुण्याच्या कोंढवा परिसरातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *