Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा नांदेडमध्ये दुसरा बळी; दहावीतील विद्यार्थांने संपवले जीवन

343 0

नांदेड : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्याचे वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणापायी आज नांदेडमध्ये दुसरा बळी गेला आहे. नायगाव तालुक्यातील भोपळा येथील शालेय विद्यार्थ्याने जीवन संपवले आहे. दहावीत शिकणारा 17 वर्षीय ओमकार बावणे याने विहीरीत उडी घेउन आत्महत्या केली. शिक्षणासाठी फी भरण्याची ऐपत नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असल्याची सुसाईट नोट लिहून त्याने आत्महत्या केली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बळी गेले. काल पहाटे हदगाव तालुक्यातील वडगाव तेथील 24 वर्षीय तरुण शुभम पवार याने विष पिऊन आत्महत्या केली होती. आज रात्री शुभमच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. शुभमच्या चितेची आग थंड होण्यापूर्वी आणखी एकाने नांदेडमध्ये आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील भोपळा येथे एका शालेय विद्यार्थ्यांने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय ओमकार बावने याने विहीरीत उडी घेउन आत्महत्या केली.

मृत्यूपूर्वी लिहिली चिट्ठी
आत्महत्या करण्यापूर्वी विहिरीवर लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये माझे आई वडील मोल मजुरी करून आम्हाला शिक्षण शिकवत होते. पण त्यांची परिस्थिती मला पाहवत नव्हती. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे, असं त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नांदेड जिल्हात मराठा आरक्षण आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share This News

Related Post

महाराष्ट्रातील 3 हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - November 26, 2022 0
नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्याला भांडवली गुंतवणुकीसाठी सन 2021-22 साठी 15 हजार कोटीं रुपयांचे विशेष सहाय्य केले होते. त्यामध्ये…
Ratnagiri Crime

धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 20, 2023 0
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.…

रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक

Posted by - May 31, 2022 0
अहमदनगर – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणार्यास अटक करण्यात आली आहे. त्याला आज…
Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser

Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser : ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित!

Posted by - March 4, 2024 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा (Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser) चांगलाच तापला आहे. यामुळे राज्यातील…
Sangli News

Sangli News : धक्कादायक ! सांगलीमध्ये 2 मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत

Posted by - September 15, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मिरजेच्या कृष्णात धुणे धुण्यासाठी पाच परप्रांतीय तरुण गेले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *