Nanded Crime

सख्खा भाऊ पक्का वैरी ! ‘या’ शुल्लक कारणातून भावानेच केली भावाची हत्या

752 0

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक अपघाताची घटना घडली होती. यामध्ये मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) गेलेल्या एका 62 वर्षीय व्यक्तीचा कारच्या धडकेत मृत्यू झाला होता.हदगाव तालुक्यातील मनाठा या ठिकाणी हा अपघात झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली. हा अपघात घडला नसून हा अपघात घडवण्यात आला होता. आणि हा अपघात (Accident) घडवण्यामागे मृत व्यक्तीच्या लहान भावाचा हात आहे. जुन्या वादातून लहान भावानेच आपल्या मुलांच्या मदतीने मोठ्या अपघात घडवून आणला आहे. या प्रकरणी मनाठा पोलिसांनी (Manatha Police) मृताचा भाऊ आणि तीन पुतण्यासह सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मृत उत्तम शिंदे (Uttam Shinde) आणि त्यांचा सख्खा लहान भाऊ मारोती शिंदे (Maroti Shinde) यांच्यात मागच्या काही वर्षांपासून शेती आणि संस्थेचा वाद सुरू होता. यामुळे अनेकवेळा त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. यादरम्यान 2 जूनला उत्तम शिंदे हे आपल्या मित्रासोबत मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. मनाठा येथील रमेश बोईनवाड यांच्या आखाड्याजवळ येताच त्यांना कारने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

यानंतर हा अपघात नसून घातपात आहे. जुना वाद मनात ठेवून आणि कट कारस्थान रचून आरोपींनी हा अपघात घडवून आणला आणि उत्तम शिंदे यांचा खून केला, असा आरोप मृत उत्तम शिंदे यांच्या मुलाने केला आहे. तसेच आरोपी विरोधात जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पावित्रादेखील मृत उत्तम शिंदे यांच्या नातेवाईकांनी घेतला.

यानंतर मनाठा पोलिसांनी विशाल शिंदे (Vishal Shinde) यांच्या तक्रारीवरून मृताचा भाऊ मारोतराव शिंदे, पुतण्या सुहास शिंदे, अमोल शिंदे, संदीप शिंदे यांच्यासह शेजारी असलेले संजय नारायण बल्लाळ, शुभम बल्लाळ, सौरभ बल्लाळ यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. शुल्लक कारणातून सख्ख्या भावानेच भावाचा काटा काढल्याने मनाठा गावामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोषी शेकडे (Assistant Police Inspector Santoshi Shekde) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Solapur Crime

Solapur Crime : शेतात काम केल्याचे पैसे न दिल्याने संतापलेल्या नातवाने आजीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Posted by - August 7, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Crime) आजी आणि नातवाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये शेतातील काम करुन घेत कामाचे…
Rikshaw

सहकार नगरमधील मुक्तांगण शाळेशेजारी रिक्षावर झाड कोसळले; महिलेचा मृत्यू

Posted by - June 12, 2023 0
पुणे : पुण्यातील सहकार नगर, मुक्तांगण शाळेशेजारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका रिक्षावर मोठे झाड कोसळल्यामुळे एका महिलेला…

मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प गतिमान करा;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Posted by - July 7, 2022 0
मुंबई:राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे, शेतकरी बांधवांचे मोठे योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व…
Atul Save

Atul Save : ओबीसी, एससी, एसटी आरक्षण रद्द करणार नाही याची हमी काँग्रेसने द्यावी; भाजप मंत्री अतुल सावे यांचे आव्हान

Posted by - May 4, 2024 0
छत्रपती संभाजीनगर :- एससी,एसटी आणि ओबीसींचा आरक्षणाचा हक्क हिरावून ते आरक्षण अल्पसंख्यांकांच्या घशात घालण्याचा कॉंग्रेसचा मनसुबा असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे…

मोदींच्या विरोधात काँग्रेसचे राज्यात उद्यापासून ‘मोदी माफी मागो’ आंदोलन

Posted by - February 8, 2022 0
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यात उद्यापासून ‘मोदी माफी मागो…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *