Jalgaon News

Jalgaon News : मी शिर्डीला जातोय… घरी सांगून तरुणाची स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या

1004 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon News) एका तरुणाने गावातील स्मशानभूमीत शर्टाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली आहे. संजय हरी पाटील (वय 32, रा. शिरसोली प्र. बो. ता.जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. ते घटनेच्या दिवशी शिर्डीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, अचानक त्याने आपला रस्ता बदलला आणि थेट स्मशानभूमीत जाऊन साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Satara Accident : महाबळेश्वरला फिरायला गेले असताना दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

गावातील गोलू पवार हे स्मशानभूमी परिसरातून जात असताना त्याच्या लक्षात ही बाब आली, त्यांनी तत्काळ घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील शरद पाटील, श्रीकृष्ण बारी यांना कळविली. यानंतर या प्रकरणाची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने संजय पाटील याला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

संजय पाटील याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. शिर्डीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेला संजय पाटील याच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे (Jalgaon News) सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुंडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार समुद्राखालून, किती वर्षात तयार होणार अंडर सी बोगदा ?

Posted by - April 8, 2023 0
मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी हायस्पीड बुलेट ट्रेन समुद्राखालील बोगद्यामधून धावणार आहे. लवकरच देशातील पहिल्या अंडर सी बोगद्याच्या कामाला सुरवात होणार आहे.…
Uddhav Thackeray

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘तो’ अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला

Posted by - April 27, 2024 0
मुंबई : ठाकरे गटाच्या प्रचार गीताचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) बजावलेल्या…

मोठी बातमी : परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्या दरम्यान गोंधळ

Posted by - December 13, 2022 0
परभणी : आज पुण्यामध्ये बंद पळून मूक मोर्चा काढण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी…

भाजपाचं मिशन 45; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्यामागे काय आहे रणनीती

Posted by - August 8, 2022 0
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान बारामती दौऱ्यावर येत असून यावरून शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता…
Pune Police News

Pune Police News : खाकी वर्दीतील रणरागिनी! ‘ज्या’ महिला पोलीस कर्मचाऱ्यामुळे हत्येची घटना टळली, त्यांचा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केला सत्कार

Posted by - December 29, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Police News) मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांमध्ये दहशत पसरवून कोयत्याने वार केल्याची घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *