Mahadev Book App

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

450 0

दुबई : वृत्तसंस्था – महादेव ऑनलाईन सट्टेबाजी अ‍ॅपचा (Mahadev Book App) सहसंस्थापक रवि उप्पल याला यूएईमधून अटक करण्यात आली आहे. तेथील तपास यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले आहे. रवि उप्पल हा भारतात मोस्ट वांटेड आहे आणि त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यात आली होती. भारतीय तपास यंत्रणा या यूएईमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.रवि हा महादेव अ‍ॅप प्रकरणात ईडीने मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याचा सहयोगी आहे.

सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे या कंपनीचे प्रमोटर्स असून, ही कंपनी कथितरीत्या क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, पोकर आणि कार्ड गेमसहित अनेक लाइव्ह गेम्समध्ये कथित अवैध सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म पुरवते. ही कंपनी गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. कंपनीचे प्रवर्तक छत्तीसगडमधल्या भिलाई इथले आहेत.

महादेव ऑनलाइन बुक सट्टेबाजी अ‍ॅप्लिकेशन हे एक प्रमुख सिंडिकेट असून, ते अवैध सट्टेबाजी करणाऱ्या वेबसाइट्सना सक्षम करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सची व्यवस्था करतं. भारतात या महादेव बुक अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. पण हे इतर देशांमध्ये सुरू आहे. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल या दोघांविरुद्ध लूक आऊट परिपत्रक जारी करण्यात आले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Related Post

PSLVC-56

ISRO : इस्रोची आणखी एक यशस्वी कामगिरी, सिंगापूरच्या 7 ग्रहांचं केलं यशस्वी प्रक्षेपण

Posted by - July 30, 2023 0
अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण केले…
Delhi-Pune Flight

Delhi-Pune Flight : खळबळजनक ! दिल्ली-पुणे विस्तारा विमान बॉम्बने उडवण्याची मिळाली धमकी

Posted by - August 18, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विमानतळावर दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली यामुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे.…
National Space Day

National Space Day : केंद्र सरकारची मोठी घोषणा; 23 ऑगस्ट ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ होणार साजरा

Posted by - October 15, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्रोच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करत भारताने एक नवा इतिहास (National Space Day) रचला.…

Pune Crime: फेसबुकवरील मैत्रिणीला हॉटेलमध्ये भेटणं आलं अंगाशी

Posted by - August 19, 2023 0
पुणे: सध्या सोशल मीडियाचा वापर मोठया प्रमाणावर वाढला असून यातून अनेकदा मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे देखील होताना पाहायला मिळतात. असाच…
Wardha Crime

Wardha Crime : गावात दहशत पसरवणाऱ्या गुंडाला गावकऱ्यांनी ‘या’ पद्धतीने शिकवला धडा

Posted by - August 11, 2023 0
वर्धा : वर्धा (Wardha Crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Wardha Crime) कारागृहातून जामिनावर आल्यानंतर गावात दहशत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *