Mahadev App

Mahadev App : ‘महादेव अ‍ॅप’ प्रकरणात नवी अपडेट; मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन

1706 0

मुंबई : ‘महादेव अ‍ॅप’ (Mahadev App) प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. ‘महादेव अ‍ॅप’ तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे. या पथकामध्ये सायबर तज्ज्ञ, आर्थिक गुन्हे तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. महादेव बुक बेटिंग अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर,रवी उप्पल, शुभम सोनी आणि इतर 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, 15,000 कोटी रुपयांच्या फसवणुकीसह याप्रकरणी मॅच फिक्सिंग, बेकायदा हवाला व कूट चलनाच्या व्हवहाराचे आरोप त्यांच्यावर आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे लग्न सौरभ चंद्राकरचं होतं. सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे. सौरभनं त्याचा मित्र रवी उप्पलसोबत ‘महादेव ऑनलाईन अ‍ॅप’ सुरू केलं होतं. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्याशाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झाले.

महादेव अ‍ॅप प्रकरणातील आरोपींनी 2023 या कालावधीत एकूण 15 हजार कोटी रुपयांचा जुगार आणि सायबर फसवणूक केली आहे. आरोपींविरोधात कलम 420, 465, 467, 120 बी, 12 अ, जुगार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (क), 66 (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला मिळाला जामीन

Posted by - February 17, 2022 0
मुंबई- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकला जामीन मिळाला असून त्याची जेलमधून…
Vishal Agrawal

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर विशाल अगरवालला कशी झाली होती अटक?

Posted by - May 22, 2024 0
पुणे : कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण…

पिंपरी- चिंचवड महापालिका देणार तृतीय पंथीयांना पेन्शन, काय आहेत त्याचे निकष ?

Posted by - May 11, 2022 0
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असलेले व ज्यांचे ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा तृतीयपंथी व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून…

नविन दिशाहीन घोषणा जाहीर करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी घोषित केलेल्या कामांचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा – इम्तियाज जलील

Posted by - June 5, 2022 0
औरंगाबाद शहरात ०८ जुन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत असून या सभेत ठाकरे यांनी नेहमी प्रमाणे धार्मिक मुद्दे,…

पंढरपुरात खासदार धनंजय महाडिक यांना मोठा धक्का; 11 पैकी सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता

Posted by - December 20, 2022 0
पंढरपूर : राज्यात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होतो आहे. आज राज्यातील 7000 हुन अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *